top of page
Writer's pictureAimSolute Solutionist

आर्थिक साक्षरतेची दशसूत्री

आर्थिक साक्षरता म्हणजे म्हणजे काय ? हे आपण यापूर्वीच्या लेखात समजावून घेतले. तुमच्या जवळील पैशाचे केलेलं नियोजन किंवा ते पैसे योग्य हाताळण्याची तुमच्यातील क्षमता जसे बजेट (आर्थिक मर्यादांनुसार जमा-खर्चाची तोंड मिळवणी करण्याची कला), गुंतवणूक , क्रेडिट मॅनेजमेंट आणि आर्थिक मॅनेजमेंट इत्यादी सारख्या आर्थिक संकल्पना समजून घेऊन ते अंगिकारणे हे सर्व आर्थिक साक्षरतेत येतं. हे आर्थिक नियोजन जीवनात विविध टप्प्यावर तुमची मदत करेल. भविष्यात आपल्या बजेटनुसार आधीच केलेलं नियोजन ज्यामुळे अशा व्यक्ती निराश होत नाहीत त्याच्यात उमेद कायम असते आणि त्याची फसवणूक होत नाही. भविष्याची तरतूद असल्यामुळे ते वर्तमान काळातही सुखी, समाधानी असतात. 


आर्थिक साक्षरतेमध्ये बचत, अनुशासन, पगार, गुंतवणूक, शिक्षण, विमा आणि कर्जाचा हप्ता – व्याज यांचा समावेश होतो.


आर्थिक साक्षरतेचे फायदे :


• पैशाचे योग्य नियोजन 

• अर्थपूर्ण गुंतवणूक 

• हुशारीने आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता

• आर्थिक सुसंगतपणा 

• सुनिश्चित आर्थिक ध्येयप्राप्ती 

• खर्चावर नियंत्रण आणि बचत 

• आर्थिक भविष्य नियोजन 

• विमा, कर्ज, गुंतवणूक आणि क्रेडिट कार्ड वापरताना नैतिक निर्णय घेण्यात वाढ

• बचत करण्याची आपसूक सवय लागते 

• आर्थिक साक्षरतेचे घटक


आर्थिक साक्षरतेची दशसूत्री :

१. प्रत्येक खर्च केलेल्या आणि आपल्याला मिळालेल्या पैशाची नोंद करून ठेऊया.


२. पैसे ठेवण्यासाठी सुरक्षित पर्यायांचा वापर करूया. बँकिंग ला दुसरा पर्याय असूच शकत नाही. कितीही लहान असली तर ती रक्कम बँकेत ठेऊया.


३. इ - पेमेंट सुविधा खात्रीलायक आहेत. योग्य ती सुरक्षितता बाळगून जास्तीत जास्त व्यवहार डिजिटल पद्धतीने करूया.


४. भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी गुंतवणुकीचे नवे मार्ग समजून घेऊ. सोने, जमीन आणि केवळ गुंतवणूक म्हणून घरांत गुंतवणूक ही आपल्या आणि देशाच्या दृष्टीने फायद्याची नसल्याने बँक एफडी, शेअर बाजार, म्युच्युअल फंड, निवृत्तीसाठीच्या विमा योजना हे नवे गुंतवणुकीचे मार्ग सल्लागारांमार्फत चोखाळू.


५. भविष्यात आरोग्यावरील खर्च वाढतच जाणार असल्याने कुटुंबाचा आरोग्य विमा काढून घेऊ.


६. ज्या गुंतवणुकीतून अव्वा की सव्वा परतावा मिळणार असे सांगितले जाते, अशा फसव्या गुंतवणुकीपासून दूर राहू.


७.  जीवन विमा ही गुंतवणूक नसल्याने तो न काढता टर्म इन्शुरन्स हा तरुणपणीच घेऊ.


८. गुंतवणुकीला चांगला परतावा मिळण्यासाठी बहुतेक गुंतवणुकीला दीर्घकाळ द्यावा लागतो, त्यामुळे जी रक्कम पुढील काही महिन्यात लागणार आहे, अशी रक्कम गुंतवणुकीत अडकविण्याची चूक करणार नाही.


९. खरेदी करताना त्या प्रत्येक होणार गरज, त्याचा होणार वापर , त्या वस्तूची एकूण किंमत या तीन घटकांचा विचार करून मग खरेदीचा निर्णय घेऊया .


१०. सगळ्यात महत्त्वाचे पैसे वाचवूया.

Комментарии


bottom of page