top of page

आर्थिक व्यवहार करताना ....


व्यवहार म्हणजे आर्थिक आदान प्रदान.

  • आर्थिक व्यवहार करताना कोणताही हलगर्जीपणा महागात पडू शकतो. आर्थिक प्रगती साधण्यासाठी, बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी आर्थिक

  • व्यवसाय करणे म्हणजे नोकरी करणे, असे नाही. दोघांमध्ये खूप फरक आहे. अर्थसाक्षरतेची गरज दोन्हीकडे तेवढीच आहे.

  • व्यवहारात पारदर्शकता असणे गरजेचे आहे. तुम्ही केलेल्या प्रत्येक व्यवहाराची तुमच्याकडे नोंद असली पाहिजे. व्यवहार कितीही रुपयांचा असो, नोंद ठेवणे आवश्यक आहे.

  • व्यवसाय नवीन सुरु करणार असाल, तर व्यवसायासंबंधित कर प्रणाली समजून घ्या . कोणकोणते कर भरणे , गरजेचे आहे , कोणते कर भरावे लागणार आहेत, याचा सावीअस्तर अभ्यास झाल्यानंतरच सुरुवात करा. या साठी योग्य मार्गदर्शकाची गरज आहे. नातेवाईक, मित्र , शक्यतो नको.

  • कर्जाची आवश्यकता असेल तरच कर्ज घ्या. तीन वर्षात ते फेडू शकू, इतपतच रक्कम कर्ज म्हणून घ्या. नाहीतर तुमचा सगळं नफा आणि तुमचे स्वतःचे पैसे सुद्धा कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी जातील.

  • व्यवसाय स्वतःचा असेल तरी, महिन्याकाठी एक ठराविक रक्कम स्वात: साठी काढून घ्या. अनेक उद्योजक आणि नवउद्योजक इथे चुका करतात आणि न संपणाऱ्या आर्थिक अडचणींना आमंत्रण देतात.

  • व्यवसाय करण्याचा मुख्य उद्देश हा नफा मिळविणे, हा असायला हवा. पण, प्रत्येक वेळी तुम्ही नफ्यात असाल, असे नाही. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न हे आणिक बाबींवर अवलंबून असते. नोकरदार माणसासारखे दर महिन्याला एक ठराविक रक्कम मिळण्याची अपेक्षा करू नका. बाजारपेठ, एकूण परिस्थिती , ग्राहकांची मानसिकता समजावून घेऊन त्याप्रमाणे नियोजन करावे लागेल. किमान सहा महिने तरी तग धरता येईल, असे निययोजन करा.


व्यवसाय सुरु करताना मला किती मिळतील? हा प्रश्न विचारू नका. तुम्ही काय देऊ शकता ? ते उपयोगी आहे का ? याचा पहिल्यांदा विचार करा . त्याचबरोबर, जो व्यवहार तुम्ही करत आहेत, तुमच्यामार्फत होतो आहे, त्या सर्व व्यवहारांची माहिती असलीच पाहिजे. अन्यथा तुम्ही तुमचा व्यवसाय योग्य प्रकारे करू शकणार नाही.आर्थिक व्यवहारांकडे पाहण्याची मानसिकता बदलण्याची नितांत गरज आहे. " चलता है , चलने दो" यातून लवकरात लवकर बाहेर या.


पैसे हे व्यवसायामध्ये महत्त्वाचे आहेतच. पण, त्याहूनही जास्त महत्वाचे जर काही असेल तर ते म्हणजे दिलेला शब्द आणि वेळ. जे तुम्ही करू शकणार नाहीत, असे कोणतेही शब्द समोरच्याला देऊ नका. शब्द न पाळण्यापेक्षा , वेळ मागून घेणे उत्तम.


bottom of page