top of page

उद्योगासाठी नवीन वर्षातील " उद्योग-संकल्प "

थांबलात ना , शीर्षक वाचून !

नवीन वर्षासाठी तुम्ही तुमच्यासाठी संकल्प केला असेल / केले असतील ना ?


मग, उद्योगासाठी काय संकल्प केले ?

हो, उद्योग आपला , संकल्प पण आपल्यालाच करायला हवेत ना.....

आपल्या उद्योगासाठी काय संकल्प करू शकतो ?

काय संकल्प करू शकतो?

  • समविचारी मित्रांचा गोतावळा वाढवूया.


  • उद्योग स्वास्थ 'स्वस्थ' ठेऊया.


  • अनावश्यक खर्च कमी करूया.


  • मागील वर्षापेक्षा या वर्षी होणारी एकूणच ' उलाढाल' वाढवूया.


  • किमान एक तरी नवीन वस्तू अथवा सेवा बाजारात आणूया.


  • नवीन ग्राहकांशी 'संवाद' साधूया.  • कुटुंबासाठी वेळ देऊया.


  • नव नवीन व्यवसाय संकल्पनेवर काम करूया.


  • सर्व प्रकारचे वाचन वाढवूया .


२०२१ हे वर्ष सर्वांसाठीच आव्हानात्मक होते. वर उल्लेख केलेल्या संकल्पांपैकी कोणतेही तीन संकल्प जरी तुम्ही ठरून पूर्ण करायचे ठरवले , तर २०२२ हे तुमचे वर्ष म्हणून सर्वांच्या स्मरणात राहील.


२०२२ हे वर्ष उद्योजकांसाठी स्थिरस्थावर करणारे ठरो. तसेच, हे नवीन वर्ष अनेक नवीन संधी देणारे ठरो आणि संपन्नता येवो, याच शुभेच्छा !!

bottom of page