अभिनंदन !!
उद्योग जगतात आपले स्वागत आहे .
उद्योग करण्याचे तर तुम्ही निश्चित केले . पुढील नियोजन करण्यापूर्वी या सध्या सोप्या प्रश्नांची उत्तरे शोधा.
१. तुम्ही कोणत्या विषयात पारंगत आहात ?
तुमच्या अधिकाराचे क्षेत्र कोणते?
उद्योजक होण्यासाठी एकपेक्षा जास्त क्षमतांची आवश्यकता आहे. तुमचा क्षेत्राबरोबरच इतर क्षेत्रांचीही पायाभूत माहिती असणे गरजेचे आहे.
२. ज्या विषयामध्ये तुम्ही पारंगत आहात किंवा ज्या विषयाचे तुम्हाला चांगले ज्ञान आहे, त्या विषयासंबंधित उद्योग सुरु करू इच्छिता?
की वेगळ्या विषयाशी संबंधित?
व्यायसायाच्या दृष्टीने उपयोगी असा कोणता अभ्यासक्रम पूर्ण करण्याची गरज वाटते का?
३. तुमच्या मनातील तुमच्या व्यायसायाची कल्पना तुम्ही कागदावर लिहून काढली आहे का ?
अगदी लहान सहान बारकाव्यांसहित , जसे जमेल तसे , कागदावर लिहून काढा.
४. किती भांडवल उभारण्याची माझी तयारी आहे ?
५. भांडवल उभारण्यासाठी काही योजना तयार आहेत का ?
राज्य सरकार आणि केंद्र सरकार नवीन उद्योग उभारणीसाठी काही योजना आणि सवलती देत असतात. या योजनांचा उपयोग व्यवसायासाठी होऊ शकतो का?
६. तुम्हाला किती भांडवल लागणार आहे ?
भांडवल उभारणीसाठी नातेवाईक , मित्र, यांच्यावर अवलंबून न राहता अन्य पर्यायांचा विचार करा.
७. व्ययसाय सुरु करण्यासाठी जागेची आवश्यकता किती आहे?
किती जागा लागणार आहे ?
८. कोणत्या ठिकाणी जागा घेणे जास्त योग्य असेल? जागा विकत घेणार कि भाडे तत्त्वावर?
९. तुम्हाला जो कच्चा माल किंवा सेवा लागणार आहात, त्या सर्व कोठे मिळतात किंवा कोण देतात , याची तुमच्याकडे संपूर्ण माहिती आहे ना ?
१०. तुम्हाला कोणत्या प्रकारचे जीवन जगायला आवडेल ? नोकरी करून सेवानिवृत्त होण्याचे ? स्वतः चा उद्योग सुरु करू स्वावलंबी होण्याचे?
आणि सगळ्यात महत्त्वाचे दिवस रात्र एक करून कष्ट करण्याची माझी तयारी आहे ना ? उद्योजक होण्याचा प्रवास हा सोपा नक्कीच नाही.
पण, संयम, कष्ट करण्याची तयारी, धाडस या गुणांच्या आधारावर तो नक्कीच सुलभ होऊ शकतो.
Comments