top of page

' उद्योजकता ' म्हणजे नेमके काय ?

व्यवसाय म्हणजे उद्योजकता नाही. या दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत. दोन्हीमध्ये मुलभूत फरक आहे.


उद्योजकता ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. निर्माण होणाऱ्या नवनवीन गरजा आणि उद्योजकता यांचे सम प्रमाण आहे. उद्योजकता ही संकल्पना समजून घ्यायलाच हवी, तुम्ही क्षणीही असलात तरीही, थोडा वेळ देऊन ... .


उद्योजकतेमध्ये चार गोष्टी समाविष्ट होतात किंवा व्हायला पाहिजेत. त्यांना आपण उद्योजकतेचे चार पैलू म्हणूया :


पहिला पैलू म्हणजे लोकांची गरज ओळखणे. सगळ्यात महत्त्वाचं आणि अत्यंत महत्त्वाचा . ग्राहकांना नेमके काय आहे ? हे समजलेच पाहिजे. त्यासाठी वेळ देण्याची मात्र तयारी हवी.

दुसरे पैलू म्हणजे नाविन्य. नाविन्य म्हणजे उद्योजकतेचा गाभा. नाविन्य मग ते प्रक्रियेमध्ये , ते तुम्ही देणार त्या सेवेमध्ये असते की, ते तुमच्या ग्राहक वर्गामध्ये सुद्धा असू शकते.


तिसरा पैलू म्हणजे जोखीम . जोखीम घेण्याची तयारी . व्यवसाय आणि उद्योजकता यातील मुख्य फरक , असे देखील म्हणू शकतो. जोखीम घेतल्याशिवाय तुम्ही या उद्योजकतेच्या गर्तेमध्ये उडी नाही घेऊ शकत.


चौथा पैलू म्हणजे आर्थिक उत्पन्न मिळविणे. ग्राहकांची गरज ओळखून, जोखीम घेत , सेवा देणे इतपतच उद्योजकता नाही. तर या सगळ्या प्रक्रियेतून एक ठराविक आर्थिक उत्पन्न मिळायला हवे.


थोडक्यात , उद्योजकता ही प्रक्रिया कंपनीची सुरूवात करणे, विकसित करणे, व्यवस्थापित करणे सर्व जोखीम घेताना आणि त्यातून नफा मिळवणे. हे उत्पादनातील चार घटकांपैकी एक आहे,


“ जो नेहमी बदलांचा शोध घेतो, त्यास प्रतिसाद देतो आणि संधी म्हणून त्याचा अगदी योग्य उपयोग करतो तो उद्योजक आहे ”
- पीटर ड्रकर , आधुनिक व्यवस्थापनाचे जनक

ते पुढे असेही म्हणतात की, “समस्या सोडवण्याद्वारे नव्हे तर संधींचा उपयोग करून ईच्छीत परिणाम प्राप्त केले जातात.”


” लोकांची गरज ओळखून केलेला नाविन्यपूर्ण व जोखिमेचा आर्थिक देवाण घेवाणीचा उपक्रम म्हणजे उद्द्योजकता होय ”

Comments


bottom of page