" उद्योगमहर्षी - शंतनुराव किर्लोस्कर "

Updated: Jun 15, 2021

२८ मे


भारतातील " उद्योजक " संस्कृतीचे प्रवर्तक, उद्योगमहर्षी शंतनुराव किर्लोस्कर (२८ मे १९०३ - २४ एप्रिल १९९४) यांचा जन्मदिन.


लक्ष्मण राव किर्लोस्कर यांनी, आपल्या मुलाचे नाव ‘शंतनु’ असे ठेवले. ‘शं तनोति इति शंतनु’ - ज्याच्या स्पर्शाने कल्याण होते तो शंतनु. या शंतनुरावांच्या स्पर्शाने केवळ उद्योगजगताचे कल्याणच झाले नाही तर, या परिसाच्या स्पर्शाने संपूर्ण उद्योग विश्वाला एक नवी दिशा मिळाली. अनेक संधी निर्माण झाल्या. खुल्या बाजारपेठेचा पुरस्कार १९५० च्या दरम्यान करणारे ते द्रष्टे उद्योजक होते.


धाडस म्हणजे काय ? सचोटीने व्यापार कसा करायचा? आपली प्रगती साधत आपल्या बांधवाना कसे साहाय्य्य करायचे? आपल्या "कृषिप्रधान" देशाची खरी गरज काय आहे? या सगळ्यांचा वस्तुपाठ म्हणजे ' शंतनुराव" .

आज भारतातील प्रत्येक उद्योजक हा त्यांचा ऋणी आहे आणि कायम राहील.
मराठी माणूस उद्योग करू शकत नाही तर मराठी माणूस उद्योग साम्राज्य उभे करू शकतो, हे सिद्ध करण्याचं काम ज्या उद्योजकांनी केले, त्यामध्ये " शंतनुराव किर्लोस्कर " हे नाव विसरता येणार नाही.


आज भारतातील प्रत्येक उद्योजक हा त्यांचा ऋणी आहे आणि कायम राहील.


" माझ्यासाठी शंतनुराव हे भारतातील क्रमांक दोनचे व्यक्तिमत्त्व आहे. पहिलाक्रमांक महात्मा गांधींचा आहे " - फ्रेड शुले , जर्मन उद्योजक

प्रत्येक उद्योजकाने एकदा तरी, सविता भावे यांनी लिहिलेले ‘कालापुढती चार पाऊले’ हे चरित्र अथवा ‘कॅक्टस अँड रोझेस’ हे आत्मचरित्र एकदा तरी वाचावयास हवे.


सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शंतनुरावांनी आधुनिक, व्यावसायिक, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा कृतीशील प्रचार महाराष्ट्रात केला आणि‘उद्योजक’ या शब्दाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.


एका ब्लॉग मध्ये सर्व करतांना स्पर्श करणे हे केवळ अशक्य. पण, हा छोटासा प्रयत्न... या पदमभूषण , राष्ट्रभूषण "उद्योग पितामह " व्यक्तिमत्त्वाला विनम्र आदरांजली