नवीनउद्योग सुरू करताय ना ?
मग , असलेल्या अनेक संधी आणि पर्यायांमधून योग्य संधीची आणि पर्यायाची निवड करावी लागणार आहे.
आता खरा परीक्षेचा काळ सुरु झाला.
कोणता उद्योग अथवा व्यवसाय निवडावा?
उद्योगाची स्थापना कशी करावी?
चालू केलेला उद्योग यशस्वीरीत्या पुढे कसा चालवावा?
या तीन प्राथमिक, सोप्या आणि तितक्याच कठीण प्रश्नांवर निर्णय घेताना सगळ्याच उद्योजकांना योग्य मार्गदर्शनाची गरज भासते.
या तीन प्राथमिक, सोप्या आणि तितक्याच कठीण प्रश्नांवर निर्णय घेताना सगळ्याच उद्योजकांना योग्य मार्गदर्शनाची गरज भासते.
खालील १० प्रश्नांनाकडे / विषयांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन , योग्य आणि व्यवहार्य निर्णय घेण्यासाठी नक्कीच मदत करू शकतो.
चला, तर मग या १० महत्वाच्या विषयांकडे अभ्यासपूर्वक लक्ष देऊयात :
१. उद्योगाचे कायदेशीर स्वरूप काय ? : आपल्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार आणि गुंतवणुकीनुसार मालक (Proprietor), भागीदारी , प्रा. लि. (Pvt Ltd ) , इ . पैकी कसे असावे याचा निर्णय घ्या. आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व कायदेशीर गोष्टींची पूर्तता करा.
२. कोणत्या नावाने आपली ओळख असावी? : आपल्या व्यायसायासाठी एक समर्पक नाव देणे गरजेचे आहे. जे नाव आपण ठरवणार आहेत , ते सुटसुटीत असावे. फार क्लीष्ट नको. आधी त्या नावाचा कोणी वापर केलेला नसावा. मुख्यत्त्वे आपला उद्योग, त्याचे स्वरूप, आपली बाजारपेठ, अशा गोष्टींचा विचार करून सर्वसमावेशक नाव निवडावे.
३. उद्योगाची नोंदणी आवश्यक आहे का? : हो. नावाइतकीच उद्योगाची कायदेशीर ओळख असणे अत्यंत महत्वाचे आहे. उद्योग आधार नोंदणी च्या संकेत स्थळावर नोंदणी करावी . नोंदणी कशी करावी , याची संपूर्ण माहिती या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
४. उद्योगासाठी आवश्यक प्रमाणपत्र कोणती ? याची माहिती असणे खूप गरजेचे आहे. आपल्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार आपल्याला काही विशेष प्रमाणपत्र लागतात का ? परवानगी लागते का? याचा अभ्यास करा आणि या प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यास सुरुवात करा.
५. कोणकोणते कर भरणे गरजेचे आहे? त्याचबरोबर, कोणकोणते कर भरणे आवश्यक आहेत आणि कोणत्या कर सवलती आपल्याला मिळू शकतात, याचाही अंदाज घेणे तितकेच गरजेचे आहे.
६..अधिकृत बँक खाते आहे का ? राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये आपल्या व्यवसायाच्या नावाने खाते उघडा .उद्योगासंबंधीत होणारे आर्थिक व्ययहार या खात्याद्वारेच करा.
७.. संकेतस्थळ आहे का? तुमच्या उद्योगाचे संकेतस्थळ तयार करा. सुरुवातीला फक्त एक पानाचे असेल तरी काही हरकत नाही. पण, त्यावर देण्यात आलेले संपर्क क्रमांक हे बरोबर आणि चालू स्थिती मध्ये आहेत, याची खात्री करा.
ग्राहकांबरोबर संपर्कात राहण्यासाठी संकेतस्थळ हे तुमचे अधिकृत माध्यम आहेच. त्याचबरोबर , काही समाज माध्यमांवर (Facebook, Instagram,Pinterest,etc.) पण तुमची उपस्थिती असणे बंधनकारक आहे.
९. कुशल मनुष्य बाळाची आवश्यकता आहे का ? : आपल्याबरोबर काम करणाऱ्या व्यक्ती शोधण्यास सुरुवात करा. मनुष्यबळाची गरज भविष्यात असणार आहे. .
तुमच्या बरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांबरोबर, तुम्हाला पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांबरोबर , तुमच्या ग्राहकांबरोबर सुद्धा संघ शक्ती ( Team Culture) विकसित करा.
१०. स्वतः मध्ये गुंतवणूक करा : स्पर्धेत टिकून राहण्यासाठी , आपल्या उद्योगाबरोबरच स्वतः ला पण विकसित करणे तितकेच महत्वाचे आहे. तुमच्या व्यायसायामध्ये तुम्ही गुंतवणूक करणारच . पण, स्वतः मध्ये पण करा.
या सर्वांबरोबरच तुम्हाला स्वतः ला तुमच्या उद्योगासाठी संबंधित घडणाऱ्या घडामोडींची आणि इतर होणारे बदल ज्याचा थेट तुमच्या व्यापारावर परिणाम करू शकतात, अशा गोष्टींची गुंतवणूक माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी वाचन हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
खरा उद्योजक तो असतो, जो उपलब्ध वेळेचा, असलेल्या संधीचा योग्य वापर करू शकतो. संयम आणि निर्णय क्षमतेला अनन्यसाधारण महत्व आहे.
ज्याला कौटुंबिक आणि व्यायसायिक कामांसाठी योग्य नियोजन करता येते. कितीही काम असले तरी कुटुंबासाठी, मित्रांसाठी , वेळ राखून ठेवा. हा वेळ तुम्हाला खूप जास्त ऊर्जा देतो पुढील ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी...
तुमच्या उद्योग जगतातील प्रवासासाठी अनेक शुभेच्छा
コメント