top of page
Writer's pictureAimSolute Solutionist

कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ll

सध्याच्या काळातील तरुणांसाठीही श्रीकृष्णाची शिकवण खूप महत्वाची आहे. संपूर्ण जग व्यापणाऱ्या , या 'जगत गुरू ' चे संपूर्ण चारित्रच जगण्याचा वस्तुपाठ आहे.


उद्योजक अपवाद कसे असतील ?


आजच्या काळात प्रत्येक माणूस हा कोणत्या तरी तणावाला सामोरे जात असतो. मग तो कितीही वर्षाच्या असो.... व्यर्थ चिंता कशाला ? उद्याची चिंता न करता, कर्म करत रहा, हाच संदेश भगवदगीतेमध्ये सांगितला आहे. नाही का?



कर्मण्‍ये वाधिकारस्ते मां फलेषु कदाचन.. |
मां कर्मफलहेतुर्भू: मांते संङगोस्त्व कर्मणि.. ||

हा श्लोक हे समजण्यासाठी पुरेसे आहे की माणसाने केवळ व्यर्थची चिंता विसरून आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.


युद्धभूमीवर शस्त्रे खाली ठेवण्याच्या पूर्ण तयारीत असणाऱ्या , अर्जुनाला , त्याच्या कर्तव्याची , ध्येयाची जाणीव , तिथेच समर भूमीवर ,करून देणारा श्रीकृष्ण. वेळ, योग्य नियोजन, पूर्व तयारी , संपूर्ण व्यवस्थापन , रणनीती, या आणि सगळ्याच विषयांकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी देण्याचे काम अत्यंत निकडीचे क्या वेळी , स्वत:च्या उदाहरणातून, श्रीकृष्णाने केले आहे.


सुदामा आणि कृष्णाच्या मैत्रीची गोष्ट आपण सर्वांनी कित्येकदा ऐकली आहे. कृष्णासारखा खरा साथीदार लाभणे हे केवळ भाग्यच... आजच्या काळात , जर उद्योजकाला एक चांगला साथीदार - भागीदार आणि खरा मित्र सापडला तर त्याला व्यवसाय करण्यास कोणतीही अडचण होणार नाही . तसेच, या मित्रांकडून बर्‍याच गोष्टींसाठी मदतही होईल. जेव्हा जेव्हा तो स्वत: चांगल्या मित्राची भूमिका करतो तेव्हा हे शक्य आहे. सर्वात कठीण परिस्थितीत आपले समर्थन करणारे मित्रच असतात.


कृष्ण एक शिक्षक, एक कलावंत, योद्धा, उपदेशक, ज्ञानाचा महासागर, शिकणारा आणि खरा प्रेमी होता. म्हणूनच त्याला सर्व गुणांचा महारथी देखील म्हटले जाते. एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी आपल्यालाही बरीच कौशल्ये आत्मसात करावी लागेल कारण आपण एकाच वेळी अनेक भूमिकांमध्ये असू शकता आणि आपल्याला लहान ते मोठ्या सर्व प्रकारच्या कामांवर लक्ष केंद्रित करावे लागू शकते.


श्रीकृष्णाचे आयुष्य सामान्य लोकांच्या आयुष्यासारखेच आहे. त्याने आपले बालपण गोकुळ या गावातील रस्त्यावर अगदी सहजपणे घालवले, तेथूनच त्याला राजत्व प्राप्त झाल, त्यानंतरही त्याला कुठलाच अहंकार नव्हता. एखाद्या तरुण उद्योजकाने यासारखेच असावे. आपल्या व्यवसायातून चांगले पैसे मिळवल्यानंतर, बढाई मारु नये.


श्रीकृष्ण म्हणजे एक उत्तम शिक्षक. प्रभावी वक्ता. आपला संदेश इतरांपर्यंत, योग्य शब्दात पोहोचवता येणे, हे उद्योग व्यवस्थित चालण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. एक चांगला वक्ता आणि त्याबरोबरच मध्यस्थाची भूमिका पण निभावता आली पाहिजे.


श्रीकृष्ण म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर

श्रीकृष्ण म्हणजे देवकीनंदन.

श्रीकृष्ण म्हणजे द्वारकाधीश.

श्रीकृष्ण म्हणजेअर्जुनाचा सारथी.

श्रीकृष्ण म्हणजेउत्तम 'बासरी वादक'.

श्रीकृष्ण म्हणजे गोवर्धन पर्वत एका करांगळीवर उचलणारा , गोपालक.


श्रीकृष्ण म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांमध्ये असणारे " चैतन्य "


वसुदेव सुतं देवं कंस चाणूर्मर्दनम्।
देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्।।


जय श्रीकृष्ण 🙏🏻🙏🏻

Comments


bottom of page