कंपनी हा शब्द आपल्यासाठी नवीन नक्कीच नाही.
पण , कंपनी / संस्था / आस्थापना म्हणजे नक्की काय ? याचा कधी विचार केला आहे का ?
मला कंपनी नवीन सुरु करायची आहे म्हणजे काय करायचे हे , हे नक्की माहिती आहे का?
पण , कंपनी म्हणजे नक्की काय ?
जेथे अनेक लोक काम करायला जातात?
जी तुम्हाला कामाच्या मोबदल्यात पगार देते?
जेथे कामाचे काही ठराविक तास असतात?
मोठ्या मोठ्या चकचकीत इमारती असतात?
जी अनेक वेळा एकाच वेळी बऱ्याच कामगारांना कामावरून कमी करते?
उद्योग उभारणे म्हणजे कंपनी स्थापित करणे का?
आहेत ना असे अनेक प्रश्न?
एक किंवा अनेक व्यक्ती , एकत्र येऊन, एकाच ध्येयाने प्रेरित होऊन, काही विशिष्ट वस्तू निर्माण करतात ( किंवा काही विशिष्ट सेवा पुरवितात ), तेव्हा कंपनी किंवा संस्था तयार होते.
हो, कंपनीला स्वतंत्र ओळख असते. तिचे स्वतः:चे असे एकमेव नाव असते. तिला कायदेशीर अस्तित्व पण आहे.
कंपनीला शाश्वत उत्तराधिकारी असतो. तिला स्वतःची मुद्रा (Seal) असते. ज्यावर तिचे नाव, नोंदणी वर्ष आणि नोंदणी केलेले राज्य याचा उल्लेख असतो.
एक व्यक्ति किवा अनेक व्यक्तींचा समूह जेव्हा काही निर्माण करण्याचे किंवा सेवा पुरवण्याचे ठवतात तेव्हा सनदशीर पद्धतीने ती समोरच्या व्यक्तिपर्यंत पोहोचावी व ती सेवा ही कायदेशीर आहे याचे एक प्रमाण त्या व्यक्तिकडे असावे, या करता एक पृष्ठभाग तयार करण्यात येतो, ज्याला भारतीय न्यायव्यवस्था व सेबी ची मान्यता असते , त्यालाच कंपनी असे म्हणतात.
एखादा व्यवसाय व्यक्तीने करणे आणि कंपनीने करणे यात फरक असून तो कंपनीने करणे हे व्यावसायिक दृष्टीने अधिक फायदेशीर असते.
コメント