वेळ ही अशी " अमूल्य " गोष्ट आहे , जी तुम्हाला रोज मिळते.
तुम्हाला चोवीस तास मिळतात - सगळ्यांना समान ; कोणलाही जास्त किंवा कमी नाही.
एकदा गेलेली वेळ कधीच परत येत नाही. अनेक जण सतत तक्रार करत असतात, कि त्यांच्याकडे वेळ नाही. मग, त्याचा होणारा परिणाम म्हणजे साचून राहिलेली कामे , त्यातून होणारी चिडचिड आणि आलेली निराशा ...
तुम्ही देखील या अनुभवातून कधी ना कधी गेला असाल...
पण,
गम्मत काय आहे माहिती का?
वेळ नाही, हा प्रश्नच नाहीये ,
कारण प्रत्येकाला मिळणार वेळ हा समान आहे.
तर या सगळ्या प्रश्न मालिकेचे उत्तर हे : वेळेचे न केलेले नियोजन हे आहे.
वेळ ही फुकट मिळालेली गोष्ट नसून तर वेळ हि एक अमूल्य गोष्ट आहे, आणि तिचा विचारपूर्वक वापर, उपयोग आणि नियोजन केले पाहिजे, आणि ते ही अत्यंत सकारात्मकपणे .
वेळेचे नियोजन करण्याचे हे साधे सोपे कानमंत्र : -
उद्या काय करायचे आहे , याची यादी आधी तयार करा . जमल्यास लिहून काढा .
सकाळपासून उठल्या उठल्या या वेळापत्रकाप्रमाणे कामाला लागा.
कोणत्या गोष्टी आधी करायचा आहेत आणि कोणत्या नंतर, हे देखील ठरवा
दररोज आपला वेळ कुठे कुठे वाया जातो याची एक यादी बनवा. या यादीतील कोणकोणत्या बाबींवरील वेळ कमी करता येईल याचा विचार करा.
प्रत्येक काम दिलेल्या किंवा नियोजित वेळेवर करा. वेळेवर नाही झाले तर अतिरिक्त ताण येऊ शकतो आणि पुढील कामे होत नाही. विनाकारण विचार करण्यात आणि ताणतणावात वेळ वाया जातो.
वेळेच्या व्यवस्थापनाची साधने वापरा. उदा. घड्याळ, कॅलेंडर, वेळापत्र
कोणत्याची गोष्टींची वाट बघण्यात वेळ घालवू नका.
रिकाम्या वेळेचा सदुपयोग करा.
एका वेळेस एकच काम करा.
दिवसभरातील कामाचा आढावा घ्या. आपल्या वेळेचे नियोजन व्यवस्थित झाले की नाही याचे विश्लेषण करा.
आपला वेळ जसा महत्त्वाचा आहे, तसाच तो इतरांचा देखील वेळ हा महत्त्वाचा आहे. हे देखील लक्षात असू द्या.
संयम खूप महत्त्वाचा . पहिल्याच वेळी केलेलं नियोजन योग्य असेल आणि ते यशस्वी होईल असे नाही.
खरं तर या विषयावर हिहीन्याची वेळ आली आहे, हीच एक मोठी शोकांतिका आहे.
पण, वर दिलेल्या छोट्या छोट्या गोष्टी केल्याने आपणच नक्कीच वेळेचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो.
आम्ही वाट पाहत आहोत. ....
Comments