जल है तो कल है

पाणी म्हणजे जीवन


या तीन शब्दांमध्ये पाणी हा किती महत्त्वाचा घटक आहे ते सांगितले आहे. सजीवांच्या अस्तित्वाचा एक महत्त्वाचा घटक असणाऱ्या या पाण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि त्याच्या उपयुक्ततेविषयी जागरूकता वाढविण्यासाठी , दरवर्षी २२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो.


UN (Water) म्हणजेच युनायटेड नेशन (वाॅटर) ही संस्था या दिवसाचे आयोजन करते.जल दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा सतत विकास लक्ष्य ६ : सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता (Sustainable Development Goal 6 ; Clean Water for All ), हे साध्य करण्यासाठी समर्थन करणे, हे आहे.


या वर्षी जागतिक जल दिनाची थीम ही : भूजल : अदृश्य दृश्यमान बनविणे , ही आहे.