top of page

" डॉ. जगताप" यांच्यासोबत 'डॉक्टर्स डे' च्या निमित्ताने रंगली " विशेष व्यक्ती , विशेष मुलाखत "

सामाजिक व मानसिक आरोग्य कसे जपावे ?

औषधे व उपचार पद्धती , शारीरिक व मानसिक आजारांची कशी ओळखावी? असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतात . त्याला समर्पक उत्तरे देणारी व्यक्ती समोर असेल तर मग ' दुग्धशर्करा' योगच ..

हो ना ?


30 जून रोजी इन्स्टाग्रामवर झालेली डॉ. दीपक जगताप ह्यांची मुलाखत ही अशीच 'अवर्णनीय' अशीच होती .


निमित्त होते डॉक्टर्स डे चे .


आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढताना डॉ. जगताप ह्यांनी अनेक गोष्टींचा अत्यंत सोप्या भाषेत उलगडा केला. उपचार पद्धती व आजारांबद्दलचे अनेक गैरसमज समर्पक उदाहरणे देत, आपल्या खास शैलीत खोडून देखील काढले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने, डॉक्टरांमधला 'कलासक्त' माणूस आणि माणसांमधला 'सेवाव्रती' डॉक्टर , असे अनेक पैलू पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली.


प्रचेतन पोतदार ह्यांनी सूत्रसंचालन केलेल्या ह्या मुलाखती मध्ये अनेक होतकरू कलाकारांनी सहभागी होऊन रंग भरले .


ह्यामध्ये युवा गायिका मानसी समुद्रे , विश्वविक्रमी तबलावादक व संगीतकार उत्कर्ष नेमाडे , चित्रकार चिन्मयी पिसे ,भारतीय वायुदलात सक्रिय असलेले कुशल शर्मा , व इंग्रजी लेखनात स्वतः चे नवे स्थान निर्माण करणारे वैभव मालपाणी , दिशा तासगावकर ह्यांचा समावेश होता .


मुलाखती मध्ये रुग्ण व शिकाऊ डॉक्टरांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देताना डॉ दीपक जगताप ह्यांच्या मधील चित्रकार देखील नव्याने अनुभवायला मिळाला


ही मुलाखत यशस्वी व्हावी म्हणून उत्कर्ष जगताप , हर्षदा पोतदार ह्यांनी विशेष परिश्रम घेतले .


जर आपण ही मुलाखत पुन्हा पाहू इच्छित असाल तर खालील लिंक वर जरूर क्लिक करा -


भाग 1


भाग 2

Comments


bottom of page