top of page
Writer's pictureMs. Harshadaa Potadar

ध्येय ठरविताना ....

उद्योग सुरु करताना आपल्याला काय करायचे आहे, हे माहित असायलाच हवे.

आपले ध्येय काय आहे ? मी ते ठरविले आहे ना ?

मी माझा व्यवसाय का सुरु करत आहे?

यातून मला काय प्राप्त करण्याची उच्च आहे? नफा, प्रसिद्धी, समाधान की आणखी काही आणि केव्हा?


उद्योग सुरु करतानाच किंवा करण्यापूर्वी उद्योजकाचे आपले ' ध्येय ' काय आहे , हे निश्चित करावे.


प्रवासाला निघताना जसे आपण -

  • कोठे जायचे ? (जाण्याचे ठिकाण )

  • कधी निघायचे ? ( वेळ )

  • कसे जायचे ? ( पायी, प्रवासी वाहनाने, खाजगी वाहनाने , इ. )

  • किती वेळ लागेल ? ( प्रवासाचा एकूण कालावधी )

  • मुक्कामाची गरज आहे का ? आणि असल्यास किती वेळा मुक्काम करावा लागेल? आणि कोठे ?

  • किती खर्च होईल ? (प्रवास खर्च , इंधन खर्च, इ. )

अशा अनेक प्रश्नांचा तपशीलवार विचार करतो ना ?



उद्योगाचे देखील तसेच आहे .

  • आपण कोठे जायचे (उचित ध्येयाकडे , उद्दिष्टाकडे ) ?

  • कधी निघायचे ? ( माझी तयारी आहे ना? अजून काय तयारी केल्यावर मी ध्येयाकडे वाटचाल करू शकेल ? )

  • कसे जायचे ( सर्वाना सोबत घेऊन, ग्राहकांचे समाधान करत, पाच वर्षांमध्ये , इ. )

  • किती वेळ लागेल ? ( अंदाजे दोन वर्ष )

  • मुक्कामाची गरज आहे का ? आणि असल्यास किती वेळा मुक्काम करावा लागेल? आणि कोठे ?

  • किती खर्च होईल ? ( अंदाजे एक लाख रुपये , इ. )

(कंसातील उत्तरे ही उदाहरणादाखल दिलेली आहेत. प्रत्येक व्यवसायानुसार , ही उत्तरे बदलत जाणार आहेत. )


ध्येय ठरविणे म्हणजे काय ?

सोप्या भाषेत सांगायचे तर , तुम्हाला ठराविक वेळेत काय मिळवायचे आहे ? याचा सविस्तर आणि सखोल विचार करणे , आणि त्यानुसार दिशा ठरविणे , काळ आणि वेळेच्या मर्यादा लक्षात घेऊन, त्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची योग्य आखणी करणे .


उद्योजकाने , ध्येयाची आखणी करताना विशिष्ट कालमर्यादेनुसार करावी.

१. अल्पकालीन : सहा महिने ते एक वर्ष

२. मध्यमकालीन : एक वर्ष ते तीन वर्ष

३. दीर्घकालीन : तीन वर्ष ते पाच वर्षे


ध्येय हे संतुलित आणि समतोल असणे , हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे. ध्येय ठरविताना त्याचे आपल्या कौटुंबिक , आर्थिक , व्यावसायिक , शारीरिक , मानसिक , नैतिक अशा सहा कसोट्यांवर तासून पाहणे , गरजेचे आहे. या सहा पैकी एक जरी कसोटीमध्ये आपले ध्येय बसत नसेल, तर ते संतुलित नाही आणि जरी तुम्ही ते काबीज केले , तरी समतोल राखणे , हे आव्हान कायम तुमच्यासमोर उभे असेल.


उद्योग कोणताही असो, कोणत्याही शहरात , प्रदेशात असो, नवा अथवा काही वर्षे जुना असो, तरीही प्रत्येक उद्योजकाचे हे एकच ध्येय असले पाहिजे -

हार पत्करणे , हे माझे ध्येय नाही. कारण, मी बनलोय जिंकण्यासाठी. - अज्ञात


Comments


bottom of page