top of page
Writer's pictureMs. Harshadaa Potadar

नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले ना ?

Updated: Apr 15

नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले ना?


मग तुम्ही तयार आहात ना ! या नवीन आर्थिक वर्षात या गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका :


  • मागील आर्थिक वर्षात झालेले सर्व खर्च , विशेषतः अनावश्यक खर्च का झाले ? आणि ते कसे टाळता येतील ? याचा आढावा घ्या आणि त्याची अंमलबजावणी करा.

  • प्रत्येक महिन्याचे आर्थिक ध्येय निश्चित करा आणि त्यानुसार सगळे नियोजन करा.

  • कोणतीही आणि कोणत्याही प्रकारची देणी , कर्जाचे हप्ते थकवू नका.

  • IT रिटर्न वेळेवर फाईल करा. आणि इतर सर्व टॅक्सेस वेळेवर भरण्याची तरतूद आधीच करून ठेवा.

  • दर महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवा आणि ती रक्कम वाढेल असे नियोजन करा.

  • आपले व्यावसायिक संबंध दृढ राहण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा.

  • सर्वात महत्त्वाचे - रोजचा हिशेब, कितीही लहान रक्कम असो, लिहून ठेवा. हाताने लिहा किंवा तंत्रज्ञानाचा आधार घ्या. पण त्याच दिवशी नोंद करून ठेवा .




© हर्षदा पोतदार

+९१ ९१६८५५३९७२





Yorumlar


bottom of page