खरं तर नावात काय आहे? या प्रश्नाला एकाच उत्तर आहे : नावात काय नाही? आणि ते
नाव तुमचा कंपनीचे , उद्योगाचे असेल तर ......
" नाव " अस्तित्वाचा अविभाज्य घटक. प्रत्येक व्यक्तीची किंवा संस्थेची किंवा वस्तूची ओळख जेथून सुरु होते , ते म्हणजे नाव.
गम्मत पहा ना ?
ज्याच्या मुले आपले अस्तित्व सुरु होते ते आपले नाव आपण काढूच ठेवत नाही. पण, आपल्या उद्योगाचे नाव ठेवण्याचा हक्क मात्र आपल्याकडे आहे.
तुमच्या व्यवसायाचे नाव हे सोपे , सुटसुटीत असावे. उगाचच, मोठे नाव नको. त्यामुळे, मोठेपणा मिळत नाही.
शक्यतो , मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेत सहजगत्या बोलता वाचता आणि लिहिता येणारे, तसेच ग्राहकाच्या मनात घर करणारे असे उद्योगाचे नाव असावे.
आपण ज्या व्यवसायामध्ये आहोत , त्या व्यवसायाशी सुसंगत असणारे नाव ग्राहकांना लक्षात ठेवण्यास सोपे जाते. समाज माध्यमावर याच नावाने आपल्या उद्योगाची ओळख स्थापित होणार आहे, याचे भान ठेऊन नाव शोधावे लागते.
नाव शोधताना एका पेक्षा जास्त पर्याययांचा नक्कीच विचार व्हायला हवा. आपण जे नाव पसंद करौ, ते एकमेव असे असले पाहिजे. आधी कोणी त्या नवे व्यवसाय करत नसावा.\असे असेल तर व्यवसायामध्ये उगाचच गुंतागुंत वाढेल. त्याचबरोबर, असे करणे हे कायदेशीरदृष्टया अत्यंत चुकीचे आहे. गुम्हा म्हणून देखील त्याकडे पहिले जाऊ शकते .
नाव सुचविताना, ठरविताना नाव मार्गदर्शक तत्त्वांचा जरूर आधार घ्यावा . जसे की , नाव हे आक्षेपार्ह असू नये. ते एकमेव अद्वितीय असेच पाहिजे. तजे नाव तुम्ही ठरवणार आहात , ते नाव तुमच्यासाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे, कोणतेही नाव ठरविण्यापूर्वी त्याची उपलब्धतता तपासायला हवी.
एक कंपनीचे नाव अगदी अन्य भाषांमधील शब्द अद्वितीय आणि विविध असणे आवश्यक आहे. तो एक कंपनी इतर कोणत्याही विद्यमान नाव कॉपी करू नये, असे सुचविले आहे.
कंपनीच्या नावाचा महिमा हा एका लेखात वर्णन करणे शक्य नाही.
पुढील लेखात नक्की भेटूया..
पण, तोपर्यंत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा
コメント