top of page

बौद्धिक संपदा अधिकारांची गरज


आजच्या व्यवसायिक जगात व त्यातील वाढलेल्या स्पर्धेत बौद्धिक संपदेला विशेष महत्व आहे. बौद्धिक संपदा अधिकाराद्वारे तुमची कला, तंत्रज्ञान, सर्जनशीलता, ज्ञान यांना कायदेशीर सुरक्षा व साधनता प्राप्त करून दिले जाते. कला, तंत्रज्ञान, सर्जनशीलता, कायदे, व्यवसाय हे बौद्धिक संपदा अधिकार संबंधित विषय आहेत.


एखाद्या व्यवसायिक संस्थेची मूर्त संपदा, आर्थिक प्रगती ही तिच्या अमूर्त संपदा बौद्धिक संपदेवर अवलंबून आहे, असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. एखाद्या व्यावसायिक संस्थेसाठी बौद्धिक संपदा अधिकार कशासाठी गरजेचे असतात, हे आपल्याला पुढील मुद्यांवरून लक्षात येईल :


  • बाजारातील स्वामित्व :

बौद्धिक संपदा अधिकार हे असे कायदेशीर अधिकार आहेत. या द्वारे इतरांना ती वस्तूचे उत्पादन करण्यासाठी मर्यादित कालावधीसाठी प्रतिबंध घातला जातो, परिणामी बाजारामध्ये तुमच्या वस्तूचे स्वामित्व, वर्चस्व निर्माण होते आणि याद्वारे निश्चितच कंपनीच्या व्यवसायाला मदत होतो.


  • इतरांहून वस्तूचे वेगळेपण :

बौद्धिक संपदा अधिकारामुळे वस्तूचे इतरांहून एक वेगळेपण निर्माण होते. ज्याद्वारे त्या बस्तूचा परिणामी कंपनीचा देखील बाजारामध्ये स्वतःचा असा एक मोठा आर्थिक वाटा निर्माण होतो.


  • उत्पादन क्षमता :

भविष्याच्या दृष्टीने संशोधनावर अधिक भर देऊन बौद्धिक संपदा अधिकाराद्वारे संरक्षण प्राप्त करून आणखी उत्पादन वाढले जाते, तसचे वरील सर्व फायद्याचा विचार करता वाढलेल्या मागणीमुळे उत्पादन क्षमता देखील वाढली जाते.


  • कमीतकमी जोखीम :

बौद्धिक संपदा अधिकार द्वारे मिळालेल्या कायदेशीर सुरक्षेद्वारे व्यवसायातील जोखीमी कमी होतात.


  • स्पर्धात्मक फायदा व बाजारपेठेतील मोठा वाटा :

बौद्धिक संपदा अधिकार कार्यालयाने दिलेल्या कायदेशीर अधिकारामुळे इतर स्पर्धकांच्या तुलनेत आपल्या वस्तूला ब्रँड दर्जामुळे विशेष स्पर्धात्मक लाभ होतात.


  • वाटाघाटीवेळी तसेच करार करताना विशेष मुद्दे व ताकद प्रधान करते.


  • वापर :

स्वातंत्र्य बौद्धिक संपदा अधिकार वस्तूला विशेष नाव, बाजारात ब्रँड नावाद्वारे स्वामित्व व विशेष दर्जा, कार्यक्षेत्र नाव वापरण्याचे स्वातंत्र्य प्रधान करतात.



bottom of page