top of page

भेटूया श्री. राज मेमाणे यांना , आज संध्या. ७ वाजता

‘इति + ह् + आस’ म्हणजे इतिहास.


भूतकाळातील घटनांची सुसंगतपणे दिलेली माहिती म्हणजे ' इतिहास' होय. भूतकाळात जे काही घडले ते समजून घेणे म्हणजे इतिहासाचा अभ्यास करणे होय


इतिहासाच्या व्याख्येत ‘असे असे झाले’ असे मोघमपणे म्हटले, तरी काय झाले ? व कसे झाले ? हे सांगणारा , आजच्या प्रमाण भाषेत समजावून सांगणारा अभ्यासक जास्त महत्त्वाचा .


एखाद्या कालखंडाचा इतिहास म्हणजे त्या काळातील मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा आढावा. इतिहास जसा प्रत्येक देशाचं असतो, तसाच तो प्रत्येक गावाचा देखील असतो.


समृद्ध अशा महाराष्ट्रात अजूनही इतिहासापासून दूर असलेली, राहिलेली किंवा अपरिचित इतिहास असणारी अनेक गावे आहेत. अनेक इतिहास संशीधक असा अपरिचित इतिहास आपल्या समोर आणण्याचे काम अविरत करत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे श्री. योगेंद्र उर्फ राज मेमाणे .


पेशवेकालीन जेजुरी , पेशकालीन पंढरपूर या पुस्तकांचे लेखक , पूर्ण वेळ इतिहास संशोधक आणि मोडी लिपी तज्ञ असणारे श्री. राज मेमाणे , आज आपल्याशी गप्पागोष्टी करण्यासाठी, इतिहास म्हणजे नेमके काय आणि त्याकडे पाहण्याची दृष्टी कशी हवी ? हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा Instagram Live @prachetanpotdar आज संध्या. ७ वाजता .तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे प्रश्न, नक्की कळवा ... कंमेंट्स द्वारे अथवा aimsolute@gmail.com येथे पाठवा ...

Comments


bottom of page