लेखक : योगेंद्र उर्फ राज चंद्रकांत मेमाणे ( इतिहास संशोधक व मोडी लिपी तज्ज्ञ )
प्रकाशन संस्था : श्रीमल्हार पब्लिकेशन , पुणे
पुस्तकात काय वाचाल ?
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दावडी-निमगाव या गावाचा १८ व्या शतकातील राजकीय , सामाजिक ,सांस्कृतिक , आर्थिक, धार्मिक मोडी कागदपत्रांमधील इतिहास.
निमगाव धार्मिक : १८ व्या निमगावात कोणकोणत्या मंदिरांचे बांधकाम झाले ? त्यांच्या खर्चाची काय व्यवस्था होती ? श्री.मार्तंड देवस्थानचे मंदिराचा इतिहास किती जुना आहे ? श्री.खंडोबा निमगावात प्रकट झाल्याची कोणती कथा शिवकालीन कागदपत्रांतून समजते ? श्री.खंडोबा मंदिरावर औरंगजेबाने कधी आणि कोणत्या सालात हल्ला करून मंदिराचा विध्वंस केला ? श्री.मार्तंड देवस्थानच्या किल्ल्याचे बांधकाम गायकवाड घराण्याने केल्याचे कोणत्या कागदपत्रांतून समजते ? श्री.मार्तंड देवस्थानची व्यवस्था सरदार दमाजीराव गायकवाड यांच्या घराण्याकडून कशा पद्धतीने ठेवली जात असे.
निमगाव राजकीय :
निमगावबाबत राजकीय पत्रव्यवहार काय आढळतो ? श्रीमंत सदाशिवरावभाऊ पेशवे यांच्या दोन वेगवेगळ्या आकारातील शिक्क्यांची दोन पत्रे कोणती ? सरदार दमाजीराव गायकवाड आणि वंशजांची निमगावशी संबंधित कोणकोणती पत्रे आढळतात ? श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी चंद्रचूड घराण्याला दिलेली सनद काय आहे ? चिमाजी अप्पांच्या नेतृत्वात झालेल्या वसई मोहिमेत निमगावातील कोणती व्यक्ती धारातीर्थी पडली ? त्याचे नाव काय ?
निमगाव सामाजिक :
निमगावचा गावगाडा कसा चालत होता ? निमगावातील सामाजिक जीवनात कोणकोणत्या प्रथा-परंपरा होत्या जसे कि, पागोटे टाकणे म्हणजे काय ? सती प्रथेविषयी कोणकोणत्या नोंदी आढळतात ? मनोरंजनासाठी जे विविध प्रकारचे कोणकोणते खेळ – तमाशे केले जात असत ? त्यांचे प्रकार किती होते ? त्या काळात साधारण कशा प्रकारचे गुन्हे घडत असत ? निमगावाचे परंपरागत वतनदार कोण होते ?
निमगाव आर्थिक :
निमगावातून मराठी राज्याला कोणकोणत्या विविध प्रकारचा कर प्राप्र्त होत असे ? मराठा कालखंडात जमिनीवर कर कशा पद्धतीने आकारला जात असे ? कागदपत्रांतून त्याचे विस्तृत विश्लेषण काय आढळते ? गावखर्चातून कोणकोणत्या धार्मिक खर्चाच्या तरतुदी आढळतात ? निमगावात कोणकोणत्या प्रकारचे परंपरागत उद्योगधंदे चालत असत आणी त्यातून मिळणारे उत्पन्न काय होते ?
याशिवाय श्री.निशिकांत जोशी यांनी काढलेली अत्यंत सुंदर illustrtions , दावडी येथील गायकवाड सरदार दमाजीराव गायकवाड यांच्या गढीचे , श्री.मार्तंड संस्थांच्या भव्य अशा मंदिराचे आणि इतर कलर फोटो या पुस्तकात पहायला मिळतील
पुस्तकाची किंमत :-
४०० रुपये
श्रीमल्हार पब्लिकेशन आणि नितिन दत्तात्रय चौधरी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच प्रकाशित झालेले इतिहास संशोधक व मोडी लिपी तज्ज्ञ राज चंद्रकांत मेमाणे लिखित ' मोडी कागदपत्रांमधील दावडी निमगाव ' हे पुस्तक ज्यांना घरपोच हवे आहे, त्यांनी ९४२३७०१८४९ या नंबरवर संपर्क करावा.
धन्यवाद, राज मेमाणे
Comments