top of page

यशस्वी व्हायचंय ?

यशस्वी व्हायचंय ? या १० सवयी तुम्हाला "यशस्वी" बनवतील


अशी व्यक्ती क्वचितच सापडेल जिला आयुष्यात यशस्वी होण्याची इच्छा नाही ? पण , अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांना यशस्वी तर व्हायचे आहे, पण तिथे जायचे कसे? तिथे पोहोचण्याचा मार्ग कोणता ? अशा अनेक प्रश्नांमध्ये हरवून गेल्या आहेत.


यशापर्यंत पोहोचणायसाठी कोणताही राजमार्ग अस्तित्वात नाही, तर तो प्रत्येकाला तयार स्वत:च्या कठोर मेहेनत आणि चिकाटीच्या बळावर तयार करावा लागतो. पण , जर आपण या १० सवयी आपल्या रोजच्या जीवनामध्ये समाविष्ट केलेय, तर यशाच्या राजमार्गाकडे जाण्याची दिशा निश्चितच सापडेल.


१. प्रबळ इच्छाशक्ती :

भव्यदिव्य अशा यशाची जर आपण स्वप्ने पाहत असू, तर त्याची सुरुवात हि आपल्या मनात उमटणाऱ्या विचारांतून होते. इच्छा असणे, हे सर्वात मोठे प्रेरणा स्थान आहे. कोणत्याच बाह्य प्रेरणा स्रोत असण्यापेक्षा , मनातील इच्छा जास्त प्रबळ ठरते. यशासाठी कष्ट करण्याची आत्यंतिक तळमळ असणे, हे गरजेचे आहे.


पंगुं लंघयते गिरिम् ।

मनातील प्रबळ उच्चशक्तीच्या बळावर आपण अडचणींचे डोंगर सहज पार करू शकतो.


२. दिलेला शब्द पाळणे :

तुम्ही व्यायसायिक असा, नोकरदार असा किंवा अजून कोणी, तुमचे यश तुमच्या विचारांवर , विचारांच्या दिशेवर, अवलंबून असते. सचोटीने व्यवहार करणे, अत्यंत महत्त्वाचे. कदाचित आर्थिक नुकसान सोसावे लागेल, पण तुमच्या उद्योगाचे, व्यवसायाचे आयुष्य वाढत जाईल, नक्की.


दिलेला शब्द पाळताना, कोणाला आणि कोणता शब्द द्यायचा नाही, याचे शहाणपण असणे, आणि त्याबद्दल त्वरित निर्यय घेता येणे, ही तर खरी कसोटी.


३. जबाबदारी :

हो. जबाबदारी घेण्यामध्ये धोका असतो. मग ती कौटुंबिक जबाबदारी असो, वा व्यासायिक. त्याचबरोबर , त्या संपूर्ण कार्याचे उत्तरदायित्व तुमच्याकडे चालत येते. आणि कित्येक वेळा तुमचा वेळ, शक्ती आणि सहनशक्तीचा कस लागतो.


एखादी गोष्ट घडवून आणायची असेल, एखादा प्रकल्प पूर्ण करायचं असेल, तर एक आव्हान म्हणून " डोळसपणे " जबादारी स्वीकारणे , तुम्हाला पुढे जाण्यास मदतच करते.


४. परिश्रमाला पर्याय नाही

यशस्वी होण्याचा जर कानमंत्र कोणता असेल तर : परिश्रमाला पर्याय नाही. म्हणतात ना : प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे .


हो, कष्ट करण्याची तयारी नसेल तर यशाचे स्वप्ने पाहणे सोडून द्या. ज्याप्रमाणे प्रत्येकाचा संघर्ष हा वेगवेगळा असतो , त्याचप्रमाणे प्रत्येकाला करावे लागणारे कष्ट हे समप्रमाणात नसतात. एकाच स्वरूपाचे नसतात. एकाच गोष्टीत साम्य आहे ते म्हणजे कष्ट करण्यातील सातत्य . अट्टाहास म्हणा हवे तर..


५. चारित्र्य

चारित्र्य संपन्न व्यक्ती आपल्या प्रसन्न व्यक्तीमत्त्वाने , यशाच्या जवळ पोहोचतात.


६. सकारात्मकता

सकारात्मक विचारसरणीचा मला उपयोग होईल, असे वाटणे म्हणजे सकारात्मक विश्वास. यशाला आपलेसे करण्यासाठी, विचाराबरोबरच विश्वास महत्त्वाचा


७. द्यायला शिका

तुम्ही कधी तुम्हाला मिळणाऱ्या मोबदल्यापेक्षा अधिक काम करून बघितले आहे का ?

एकदा नक्की करून बघा.

"अधिक काहीतरी" करणारे , देणारे लोकच यशाला आपल्याकडे खेचून आणतात.


८. चिकाटी

दृढनिश्चयापुढे डोंगरसुद्धा मान वाकवितात. अपयशाचे रूपांतर हव्या असणाऱ्या यशामध्ये करण्याची ताकद तुमच्या चिकाटीमध्ये, तुमच्या दृढनिश्चयामध्ये आहे.


९.आपल्या कामाचा अभिमान

आपण केलेल्या कामाचा अभि मान असलाच पहिजे. अहंकार मात्र नाही.

अनेक गोष्टी हाती घेऊन एकही गोष्ट पूर्णत्वास जात नसेल , मोजक्याच गोष्टी लक्षपूर्वक आणि व्यवस्थितपणे करणे केव्हाही श्रेयस्कर.


१०. विद्यार्थी व्हा

मनुष्य हा कायम विद्यार्थी असतो; कधी एकलव्याच्या भूमिकेत तर कधी अर्जुनाच्या.

कधी, कुठे, केव्हा कोणती व्यक्ती अथवा काय शिकवून जाईल, हे सांगता येत नाही. आणि हे जीवनात मिळालेले धडे अनेक पुस्तके वाचून सुद्धा जे उमजून येणार नाही, ते त्या काही क्षणांत समजावून देतात. आपली फक्त तयारी हवी .... "ज्ञान"रुपी परागकण गोळा करण्याची ...तुम्हाला तुमच्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी , मनापासून शुभेच्छा .


यशस्वी भव ।


bottom of page