top of page

संवाद आणि संभाषण

' बोलणाऱ्याचे चणे विकले जातात, न बोलणाऱ्याचे सोनेही विकले जात नाही’, असे म्हणतात आणि या एकाच वाक्यात , व्यवसायासाठी ' बोलणे ' किती महत्त्वाचे आहे , हे थोड्या वेगळ्या शैलीत सांगितले आहे.


आपल्या जीवनात संवादाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संवाद - मग तो प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष, एका विशिष्ठ भाषेत असो अथवा शब्दांशिवाय असो, संवाद मात्र हवा. मानसशास्त्रीय दृष्ट्या आणि सर्वांगीण सामाजिक आरोग्यासाठी, माणसा-माणसात होणारा, वैयक्तिक, कौटुंबिक , ' संवाद ' आवश्यक आहे.

संवाद आणि संभाषण हे दोन वेगवेगळॆ शब्द आहेत. संवाद हा शब्द दोन किंवा अनेक व्यक्तींमधील , एका विशिष्ठ ध्येयाने होणारी , एका विषयाशी संबंधित चर्चा .


सध्या सोप्या भाषेत संवाद म्हणजे चर्चा , तर संभाषण म्हणजे विचाराची देवाणघेवाण , माहितीचे आदान प्रदान. विचार मग ती एखाद नवीन कल्पना असेल, मागील वर्षाचा आढावा असेल , इ . संभाषणाला सुद्धा एक विशिष्ठ उद्देश असतो.


बऱ्याचदा , संवादाची पुढची पायरी ही ' संभाषण ' असू शकते.

संभाषण म्हणजे एकापेक्षा अधिक माणसांचे आपसातील बोलणे. संभाषण म्हणजे लोकांमध्ये कल्पना, निरीक्षणे, मते किंवा भावनांचे बोलणे आदान प्रदान आहे.


संवाद आणि संभाषण कौशल्य आत्मसात करण्यासाठी , या गोष्टींचा नक्कीच उपयोग होईल :


- स्वतःचं ज्ञान, वर्तमान घडामोडींबद्दल माहिती वाढवण्यासाठी विविध विषयांबद्दल वाचा. यामुळे शब्दसंग्रह तर वाढतोच. पण, त्याचप्रमाणे वाक्यरचना कशी करावी हे समजण्यास मदत होते.


- सुरुवात घरच्यांपासून करा. तुमच्या कल्पना, विविध विषयांवरील मतं याबाबत घरच्यांसोबत चर्चा करा आणि मग हळूहळू शेजारी, नातेवाईक यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा.


- समोरासमोर बोलण्यानं आपण किती सहजतेनं बोलू शकतो हे समजतंच. त्याचबरोबर श्रोत्याच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेण्याची चांगली संधी मिळते.


- केवळ स्वतःच्या आवडीच्या नाही तर विविध विषयांवर बोलण्याचा प्रयत्न करा. समजा दुसऱ्या विषयांबाबत जास्ती माहिती नसेल तर निराश होऊ नका, माहितीसंग्रह वाढवण्यासाठी उत्सुक व्हा! दुसऱ्यांकडून नवीन शिकण्याचा प्रयत्न करा.


- लोकांशी चर्चेत सामील व्हा. स्वतःच्या बोलण्याच्या पद्धतीबाबत आत्मविश्वास निर्माण होईल. त्याचप्रमाणे योग्य शब्दांची निवड करून संवाद कसा साधावा हे देखील समजण्यास मदत होईल.


- तुम्ही बोलायला उत्सुक आणि तयार आहात असे तुमच्या वागण्यातून दाखवून द्या. यामुळे दुसऱ्यांना तुमच्याशी बोलणं सोपं जाईल.


- बोलताना नेहेमी समोरच्या व्यक्तीकडे बघून बोला.


- संभाषण सुरु ठेवण्यासाठी त्या संबंधित प्रश्न विचारा.


- सुरुवातीस संवाद साधणं हे जरी त्रासदायक किंवा कंटाळवाणं वाटलं तरीसुद्धा सहज हार मानू नका. सध्याचे जग हे वेगवान आहे आणि लोकांच्या आठवणी देखील अल्पकालीन आहे. अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्यांवर छाप पाडणं अपरिहार्य आहे आणि अशी छाप पाडण्यासाठी संवादासारखे प्रभावी कौशल्य कोणतं नाही.コメント


bottom of page