top of page

Copy of Copy of बौद्धिक संपदा

जेंव्हा एखादी व्यक्ती किंवा संस्था आपल्या बुद्धीचा वापर करून एखादी निर्मिती करते, तेंव्हा त्या निर्मितीवर मर्यादित काळापुरती तिला प्राप्त झालेली मक्तेदारी.


बौद्धिक संपदा अधिकार हे विशेष कायदेशीर आहेत जे प्रादेशिक स्वरुपाचे आहेत म्हणजे ते विशेष प्रदेशापुरते मर्यादित असतात व हे एकप्रकारे नकारात्मक स्वरूपाचे अधिकार आहेत जे इतर व्यक्तींना तुमच्या परवानगीशिवाय तुमची बौद्धिक संपदा वापरण्यापासून प्रतिबंध करतात.


बौद्धिक संपदा अधिकारांमध्ये पेटंट,कॉपीराईट,औद्योगिक डिझाइन, ट्रेड मार्क,भौगोलिक मानांकन (geographical indications GI Tag) यांचा समावेश होतो.


बौद्धिक संपदा अधिकार कायद्यांचा मुख्य उद्देश हा वेगवेगळ्या प्रकारची बौद्धिक संपदा निर्मिती करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. एखाद्या गोष्टीचा आर्थिक फायदा मिळणे किंवा तिचे श्रेय मिळणे यातून नवनवे शोध, कलाकृती यांच्या निर्मितीस प्रोत्साहन मिळते हे यामागील मुख्य तत्त्व आहे.


त्या निर्मितीच्या प्रकारावरून बौद्धिक संपदा हक्क वेगवेगळ्या प्रकारचे असतात.

  • कला क्षेत्रातल्या निर्मितीवर – साहित्य,चित्र, शिल्प, संगीत, नाट्य किंवा चलचित्र इ. – यावर त्यांच्या निर्मात्याला कॉपीराईट (स्वामित्व हक्क) मिळतो.

  • उत्पादनाची ओळख पटवणारे चिन्ह असेल किंवा ब्रॅण्डनेम किंवा उत्पादनाची ओळख बनलेलं घोषवाक्य, यावर ट्रेडमार्क मिळतो.

  • एखाद्या औद्योगिक उत्पादनाच्या सौंदर्यपूर्ण डिझाईनवर, कारचा किंवा मोबाईल फोनचा नाविन्यपूर्ण आकार, इ. वर इंडस्ट्रियल डिझाईन मिळते.

  • एखादे भौगोलिक ठिकाण जेंव्हा त्या उत्पादनाची ओळख बनते, तेंव्हा त्यावर ‘जिओग्राफिकल इंडीकेटर’ (भौगोलिक निर्देशक) ही बौद्धिक संपदा मिळते.

  • तर एखाद्या नाविन्यपूर्ण उत्पादनावर किंवा उत्पादन बनवण्याच्या प्रक्रियेवर त्याच्या संशोधकाला मिळतं ते पेटंट (एकस्व) !


Comments


bottom of page