top of page

डॉ. ज्योती शिरोडकर - 'वेग' आणि 'वेध'

Updated: Oct 3, 2021

" किती घेशील रे दोन करांनी " ह्याचा प्रत्यय म्हणजे आजची मुलाखत .


" शिक्षक दिन " हा समाज माध्यमांवर कसा साजरा होऊ शकतो, ह्याचा मूर्तिमंत प्रत्यय आज घेता आला .


निमित्त होते, इन्स्टाग्राम वर होणाऱ्या "विशेष व्यक्ती, विशेष मुलाखत'' या कार्यक्रमाच्या 'शिक्षक दिन विशेष' मुलाखतीचे ...


डॉ. ज्योती शिरोडकर BAMS, MD, Ph. D. - वैद्यकीय क्षेत्रातील अनेक अष्टपैलू व्यक्तिमत्वांपैकी एक. संस्कृत व रशियन भाषेतील त्याचे प्रभुत्व देखील सर्वश्रुत आहे . त्यामुळे इंस्टाग्रामवर उपस्थित प्रेक्षक अगदी तयारच होते हे सारे नजरेत साठविण्यासाठी ....


डायबेटीस ची लक्षणं व उपाय , भाषेवर आलेल्या प्रश्नावर दिलेलं एक अफलातून उत्तर , 'अष्टपैलू' असूनही नवनवीन शिकण्याची त्यांची जिद्द आणि सोबत असलेली श्री. अजय शिरोडकर ह्यांची लाभलेली खंबीर या अशी साथ हे सारं इंटरनेट च्या अनेक तांत्रिक अडचणीमधून देखील अनुभवता आले .


आयुर्वेदाचार्य, प्राध्यापक, वैज्ञानिक, संशोधक, सूत्रसंचालक, लेखिका, उद्योजिका इ . आणि अशा अनेक भूमिका निभावत असताना , सगळ्यात जास्त लक्षात अधोरेखित होते ती म्हणजे त्यांची 'विद्यार्थिनी' राहण्याची वृत्ती. त्याच्याच शब्दात सांगायचे तर : ज्या विषयातले आपल्याला काही कळत नाही, तेथे शून्यातून शिकण्याची तयारी हवी. अशा या विनम्र आणि चैतन्याने भरलेल्या व्यक्तिमत्त्वाचा 'वेगा'चा आलेख समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.


सोबत गौरव खेचरे ह्याने सुरांचा निरागस स्वागत सोहळा साथीदारांसोबत रंगवला, त्याला झिशान ने शायरी ची जोड दिली आणि उन्नती चौधरी हिने प्रेक्षकांना नव्याने सुरांची अनुभूती दिली.


मुलाखतीचे सूत्र संचालन प्रचेतन पोतदार, यांनी आपल्या 'आगळ्यावेगळ्या' पद्धतीने केले. ही मुलाखत पुन्हा एकदा व्हावी ही मागणी होत आहे लवकरच , फेसबुकवर आणि इतर माध्यमांतून लोकांसमोर येऊया, अशी ग्वाही देत ह्या मुलाखतीला अल्पविराम देण्यात आला.


जर तुम्हांला हे सारे पुन्हा अनुभवायचे असेल तर खालील लिंक वर जावून पुनःपुन्हा मुलाखतीचा आंनद घेऊ शकता


डॉ. शिरोडकर यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी , नक्की भेट द्या : http://hforhealth.in/

Comments


bottom of page