top of page

तू चाल पुढं ....

Updated: Apr 30

" भीती " हा मानवाचा स्थायीभाव आहे.

जेव्हा आपण रोजच्या रुळलेल्या वाटेने प्रवास करत असतो ना, तेव्हा सुद्धा आपल्याला न सांगता येणाऱ्या अनेक संकटांची भीती वाटू शकते.


उद्योजक त्याला अपवाद कसे असतील ?

आणि इथे तर होणारा प्रवास हा पूर्णपणे नवीन आहे. या प्रवासात जर कोणी सहप्रवासी असेल, तर तो फक्त अनपेक्षित अडथळे आणि उद्भवऱ्या समस्या.


मग, काय या अडथळ्यांना आणि समस्यांना घाबरून जायचे का ?


नाही... कधीच नाही.

जोपर्यंत योजलेले ध्येय साध्य होत नाही , जोपर्यंत यश गवसत नाही , तोपर्यंत तरी नक्कीच नाही,


हे यश म्हणजे काय?


आपल्याला जे हवे ते , हवं तेव्हा मिळणं म्हणजे यश.

मग ते एखाद्या परीक्षेमध्ये उत्तम गुण संपादन करणे असो ; एखाद्या दुर्धर आजारातून सहीसलामत बाहेर पडणे असो; एखादी, घरातील अथवा कार्यक्षेत्रातील , जटिल समस्या सोडविणे असो ;

यश म्हणजे निरुत्साही न होता सतत येणाऱ्या अपयशाचा सामना करत राहणं -- विन्स्टन चर्चिल

हव्या असलेल्या कौशल्यपूर्ण सहकाऱ्यांची मिळणारी साथ, हे उद्योजकाने खरे यश.

कुटुंब आणि आपले कार्यक्षेत्र दोन्हीकडे लक्ष आणि वेळ देता येणं म्हणजे उद्योजकाने खरे यश.

आपला व्यवसाय सांभाळून , या क्षेत्रात येणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणे, हे देसखील उधोजाकाचे खूप मोठे यश आहे.


रोज सकाळी ठरविलेली सगळी कामे रात्रीपर्यंत पूर्ण झाली, तर तो दिवस सार्थकी लागतो. नाही का?


पण, यशोशिखरावर कडे डोळे लावून वाटचाल करत असताना , अचानक अपयश का समोर येते?

येते ना?

आणि कधी कधी तर अपयश आपल्या समोर ठाण मांडूनच बसते.


कधी आपण या प्रश्नाकडे पाहिले आहे का?

नसेल तर या प्रश्नाकडे गांभिर्याने पाहण्याची हीच, आताची वेळ सगळ्यात जास्त योग्य आहे.


आपण या खाली खाली एकत्रित केलेल्या कारणांकडे एकदा पाहूया :


  • आळशीपणा

  • योजनेचा अभाव

  • उचित ध्येयाचा अभाव

  • न टाळता येणाऱ्या जबाबदाऱ्या

  • तात्पुरत्या यशाने हुरळून जाणे

  • अनावश्यक गोष्टींवर होणारा अनिर्बंध खर्च

  • सार काही मी एकटाच करेन , हा अट्टाहास

  • माझी संकल्पना सगळ्यात वेगळी आहे. हा अति आत्मविश्वास

  • प्राधान्यक्रम चुकीचा ठरविणे

  • क्षमतेचा अंदाज न येणे

  • लिखित स्वरूपात नियोजनाचा अभाव

  • कल्पनाविश्वात रमून जाणे

  • सातत्याचा 'सतत' अभाव


वर दिलेल्या अनेक कारणे / परिस्थिती अथवा अडथळे तुम्हीही अनुभवले आहेत का ? अनुभवण्याची शक्यता वाटते का ?


अशा अडथळ्यांचा , कारणांचा अभ्यास करून वेळीच केलेली उपाययोजना , तुम्हाला यशाच्या आणखी जवळ जाण्यास मदतच करते. त्याच बरोबर , होणारे अपरिमित नुकसान वाचविते. नुकसान मग ते वेळेचे , पैशाचे, मानसिक खाच्चिकरण, नैराश्य, अनेक वर्षांपासून एकत्र असणारे सहकारी दूर जाणे , असे अनेक प्रकारचे आणि सहजासहजी भरून न येणारे असते.




चला तर मग वाट कसली पाहताय?


वर उल्लेख केलेल्या किंवा अन्य कोणत्याही कारणाने , कोणत्याही प्रकारचे अपयश आले असेल किंवा कोणतेही कारण तुम्हाला लागू होत असेल तर त्याचे मूळकारण, मुळापासून काढून टाकूया. आणि यासाठी , आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो ( +९१ ९१६८५५३९७२)




तू चाल पुढं तुला र गड्या भिती कशाची

आता पर्वा हि फक्त ' यशाची '




©2024 by AimSolute.

  • Facebook
  • LinkedIn
  • YouTube
bottom of page