top of page

खेळाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन : ऐश्वर्य देशपांडे

Updated: Oct 8, 2021

आयुष्य हे एक प्रकारे मैदानच . ज्यात आपण वेगवेगळ्या प्रकारचे सामने खेळतो कधी जिंकतो ,कधी हरतो.... पण, बाजी तोच मारतो जो शेवटपर्यंत टिकतो .


आज वीज आणि पाऊस ह्यांच्या साक्षीने संपन्न झालेल्या विशेष मुलाखती मध्ये समोर होता - क्रीडा ,सैन्य भरती, छायाचित्रण अशा अनेक क्षेत्रात मुशाफिरी करणारा ऐश्वर्य देशपांडे. स्टे फिचर्ड प्रस्तुत, ६ ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या , मुलाखतीच्या या सत्रामध्ये खेळाच्या मैदानाबरोबरच भारतीय सैन्य दलाचीही नव्याने माहिती मिळाली.


खेळ हा काहींसाठी फक्त खेळ नसतो, त्यापलीकडे खूप काही भावना तिथे जोडलेल्या असतात . ऐश्वर्यशी बोलत असताना आज हे प्रकर्षाने जाणवले .


लिएंडर पेस ,अजित लाक्रा, इगनेस तीर्की ,पी आर श्रीजेश अशा अनेक मान्यवरांना भेटण्याचे भाग्य लाभलेल्या ऐश्वर्यच्या चेहऱ्यावर ही नावे घेताना एक वेगळीच कृतज्ञता दिसली.



खेळाडू म्हणून सैन्य दलात असणाऱ्या संधी, स्वतःहुन अनेकांना केलेलं मार्गदर्शन ,आणि अनेक वरिष्ठांकडून वेळोवेळी घेतलेला कानमंत्र , ह्यावर तो अगदी भरभरून बोलला.


गणपती बाप्पा आणि फोटोग्राफी ह्या वर बोलताना तो अधिक खुलला. सोबत महाराष्ट्र राज्यात आल्यावर, पाहण्यासाठी अनेक नवीन गोष्टी सांगितल्या. . तसेच , ऐतिहासिक स्थळांबद्दल काही नवीन गोष्टी देखील सांगितल्या .


एक दिवस आधीपासून आलेल्या अनेक प्रश्नांची त्याने समर्पक उत्तरे दिली.


शेवटच्या रॅपिड फायर ह्या सत्रात त्याच्या अनेक छटा अनुभवायला मिळाल्या.


तुम्हांला पण ह्या मुलाखती चा पुनःपुन्हा अनुभव घ्यायचा असेल तर खालील लिंक वर जरूर जा


भाग 1 / 2 :


https://www.instagram.com/tv/CUsLRpbowJx/?utm_medium=share_sheet



भाग 2 / 2 :


https://www.instagram.com/tv/CUsR6xVo-6n/?utm_medium=share_sheet

bottom of page