top of page

उद्योजकतेची मानसिकता हवी

उद्योजक होण्यासाठी औद्योगिक घराण्यात जन्म घेण्याची गरज नाही. यासारखे, अजूनही समाजात असणारे, अनेक गैरसमज उद्योजकतेची मानसिकता विकसित होण्यात अडथळा निर्माण करत आहेत.


भारतात आधुनिक उद्योगजकतेला सुरुवात झाली , ती स्वातंत्र्यपूर्व काळात. स्वतंत्रता चळवळीचं एक भाग म्हणून ... भारतीय उद्योग सुरु झाल्याशिवाय भारतीय अर्थकारण सुरु होऊ शकत नाही, ही दूरदृष्टी असणारे लोकमान्य टिळक आणि त्यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी, त्याकाळी, स्वदेशी उद्योग उभारण्यासाठी नाव उद्योजकांना प्रोत्साहित केले. तसेच, उद्योग उभारणी अनेक स्वररूपात , प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मदत देखील केली.


यातूनच. टाटा, बिर्ला यांसारखे उद्योजक सुरु राहिले. किर्लोस्करांनी देखील लोखंडी नांगर विकसित करून एका नवीन युगाची सुरुवात केली.


आजची परिस्थिती खूपच नक्कीच वेगळी आहे. उद्योगाच्या अनेकविध संधी , सोयी उपलब्ध आहेत. भांडवल उभारणीसाठी अनेक संस्था पुढे येत आहेत. तरीदेखील, उद्योजकीय मानसिकता विकसित झाली आहे का?


उद्योजकीय मानसिकता विकसित होणे गरजेचे आहे का?


'उत्तम शेती, माध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी' या भारतीय विचारसरणीवर पहिला घाव हा ब्रिटीशांनी घातला, तर दुसरा त्यांनी विकसित केलेल्या शिक्षणपद्धतीने ......


उद्योजकता , व्यापार करताना कष्टाला पर्याय नाही, तसेच सहनशीलतेला देखील... अत्यंत कल्पक असलेल्या, परंतु चैनीच्या वस्तू घेण्यात आणि वापरण्यात, मश्गुल झालेल्या आताच्या तरुण पिढीकडून खरंच आपण सहनशीलतेची, चिकाटीची अपेक्षा करावी करावी का?

जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्था यांची खऱ्या अर्थाने फळे उपभोगणाऱ्या, या पिढीकडे उद्योजकीय मानसिकता नाही, असे तरी कसे म्हणावे.

उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः ।

न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः ॥


कोणतेही काम करण्यासाठी परिश्रम हे करावेच लागतात. जंगलाचा राजा असणाऱ्या सिंहाला सुद्धा स्वस्थ बसून शिकार करता येत नाही.


उद्योग जगतात उडी मारताना , सर्वांगीण विचाराबरोबरच कृतीची जोड हवी. असे म्हणतात ,-


जो उठून उभा राहतो (उद्योग करतो ) , त्याचे दैवही उभे राहते

जो पडून राहतो, त्याचे दैवही पडून राहतो

जी हिंडतो, त्याचे दैवही गतिमान होते.


हो ना ?

bottom of page