top of page

उद्योजकाची मानसिकता

Updated: Dec 1, 2023

' उद्योजक ' आणि ' यशस्वी उद्योजक ' यांच्यामध्ये काही फरक असतो का ?

आणि खरंच आपण या प्रश्नाचे उत्तर शोधले आहे का ?

शोधणे गरजेचे आहे का ?


हो .. नक्कीच ...


उद्योजक म्हणून प्रस्थापित होण्याच्या कितीतरी आधीपासूनच किंवा या उद्योजकतेची वाट चालण्याचा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत देखील , जर एक प्रमुख घटक असेल तर तो म्हणजे त्या व्यक्तीची स्वतः:ची मानसिकता.


उद्योजक म्हणून प्रस्थापित होण्याच्या कितीतरी आधीपासूनच किंवा या उद्योजकतेची वाट चालण्याचा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत देखील , जर एक प्रमुख घटक असेल तर तो म्हणजे त्या व्यक्तीची स्वतः:ची मानसिकता. उद्योगासाठी लागणारे निरनिराळे घटक जसे भांडवल, मनुष्यबळ , जागा, इ. सर्व तुम्ही मिळवू शकता.


पण, मानसिकतेवर स्वत: च्या मानसिकतेवर मात्र तुम्हाला प्रयत्नपूर्वक आणि प्रामाणिकपणे काम करावे लागणार आहे. आपण उद्योजक होऊ शकतो, या विचारावर असलेला प्रचंड विश्वास ही कदाचित उद्योजकीय मानसिकता तयार होण्याची नांदी ठरू शकतो.


पण, मुळात मानसिकता म्हणजे काय ?


एखाद्या तुम्ही कशा प्रकारे विचार करता किंवा तुम्हाला कशा प्रकारे विचार करता येतो ?


उद्योगाचा संपूर्ण डोलारा हा उद्योजकाच्या विचारांवर आणि आणि त्या विचारांवर आधारित, वेळोवेळी, घेतलेल्या निर्णयांवर बेतलेला असतो.


उद्योजकीय मानसिकता तयार होण्यासाठी कोणताही राजमार्ग अस्तित्वात नाही. तर , सातत्य , चिकाटी, अभ्यास आणि आतमधून आलेली उद्योजक होण्याची तीव्र इच्छा या द्वारे मार्ग नक्कीच दिसू शकतो. मार्ग दिसण्यासाठी किंवा सुस्पष्ट दिसण्यासाठी मानसिकतेचा वाटा खूप महत्त्वाचा आहे.


थोडक्यात काय तर, सकारात्मक मानसिकता तुम्हाला उद्योग उभा करण्यासाठी, तो पुढे नेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.


bottom of page