top of page

गणेशोत्सव : उद्योजकतेची मांदियाळी

दहा दिवस चालणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. हा उत्सव फक्त बाप्पा, मोदक, सण, समारंभ, गौरी गणपती, गाठ - भेट , इतकाच मर्यादित नाही बर का ?


एक उद्योजक म्हणून या उत्सवाकडे बघताना हा उद्योजकतेचा देखील किती मोठा उत्सव आहे, हे लक्षात येईल. मागणी आणि पुरवठा या संकल्पना समजून घ्यायच्या असतील ना, तर गणेशोत्सवाकडे डोळस नजरेने बघायला शिकले पाहिजे. आणि केवळ हा उत्सवच नाही तर नवरात्र, दिवाळी आणि भारतात साजरे होणारे सगळेच सण आपल्याला दृष्टी देण्याने करतात. त्याकडे पाहण्याची जबाबदारी मात्र आपण घेतली पाहिजे.


लोकमान्य टिळकांनी घरोघरी साजऱ्या होणाऱ्या गणपती उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. तेथूनच अनेक नवीन वाट खुल्या झालाय. आपण थोडक्यात उदाहरणे पाहूया...

  • श्री गणेशाची मूर्ती घडविणे,

  • पेण सारख्या ठिकाणी या मूर्ती तयार होतात. तेथून आपल्या गावी आणून विकणे .

  • घरपोच गणेशमूर्ती पोहोचविणे

  • गणेश पूजनासाठी लागणारे पूजासाहित्य रास्त दारात उपलब्ध करून देणे .

  • हळदी, कूंकू, गुलाल, अष्टगंध, बुक्का, शेंदूर, जानवी जोड, कापसाची वस्त्रं, फुलवाती, समईच्या वाती इत्यादी प्रकारचे साहित्य आपल्या वेळेत बनवून या दिवसांमध्ये त्याची विक्री करू शकतो.

  • या काळात सगळ्यात जास्त मागणी जर कोणाला असेल तर ती असते पूजा सांणगणाऱ्या गुरुजींना . प्रत्येक घरी, प्रत्येक ठिकाणी गुरुजी मिळतीलच असे नाही. याला पर्याय म्हणून कालनिर्णय सारखे अँप, CD , इत्यादींचा वापर वाढवायला हवा.

  • गणपतीच्या काळात विविधं प्रकारची फुलं आणि पत्री पुजेसाठी लागते. कमळ, केवडा, जास्वंद, दुर्वा, विड्याची पानं यांना या काळात विशेष मागणी असते. ताजी टवटवीत फुलं आणि पत्री वेळेत उपलब्ध करणं हा एक उद्योग आहे.

  • देवाला नैवेद्य म्हणून ठेवण्यासाठी उत्तम प्रतीची फळविक्री हा एक उत्तम उद्योग होऊ शकतो.

  • अनेकविध प्रकारच्या मोदकांना या काळात मागणी असतेच .

  • गणपतीची आरास करण्यासाठी लागणारे साहित्य, निकनिराळ्या प्रकारचे दिवे, कृत्रिम पाने फुले, रांगोळ्या, रंगीत कागद या सर्व गोष्टींची मागणी वाढतच जाणार आहे .

  • मिरवणुकीस लागणारे फेटे, शेला , गुलाल, या कडे दुर्लक्ष करून नाही चालणार ...


पर्यावरण पूरक गणेशोत्सवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप सकारात्मक होत आहे .याचाच अर्थ असा की , पर्यावणपूरक साहित्य, उपलब्ध करून देण्याचे एक नवीन दालन उद्योजकतेला साद घालत आहे.


केवळ उदाहरणादाखल ही यादी तयार केली आहे. म्हणजे प्रत्यक्षात या काळात बाजारपेठेत होणारी उलाढाल आपल्या लक्षात आली असेलच. मग आता तुम्हीच ठरवा गणेशोत्सव म्हणजे कल्पकता, नाविन्यता या संकल्पनेवर उभ्या राहणाऱ्या उद्योजकतेची मांदियाळी नाही का ?



bottom of page