top of page

चला, ग्राहकाशी नाते जोडूया

ग्राहकाच्या उस्फुर्त सहभागाशिवाय कोणताही व्यवसाय तग धरू शकत नाहीत. परिकथेतील जादूगाराचा प्राण जसा पोपटामध्ये असतो ना, तसा कोणतयाही उद्योग-व्यवसायाचा प्राण म्हणजे ग्राहक.

आपल्याकडे ग्राहक कसे येतील ? हा सतत भेडसावणारा प्रश्न . कारण, ग्राहकांचा विश्वास संपादन करणे, ही सहजसाध्य अशी गोष्ट नक्कीच नाही. त्यासाठी, नियोजनबद्ध, जाणीवपूर्वक आणि सतत प्रयत्न करत राहायला पाहिजे.


ग्राहकांना गृहीत न धरता, त्यांच्याबरोबर एक 'सशक्त नाते' तयार होण्यासाठी, खाली दिलेल्या प्रक्रियेचा अवलंब करू शकतो. चार टप्प्यांची ही प्रक्रिया आहे.



१. ओळखा

अनेक लहान मोठे व्यायसायिक या पहिल्या टप्प्यावरच अक्षम्य अशी चूक करतात . ज्याप्रमाणे आपण देत असलेली सेवा किंवा तयार करत असलेली वस्तू ही 'एकमात्र' असते, त्याचप्रमाणे 'आपला ग्राहक' हा देखील 'एकमात्रच' असतो. दुकानात प्रत्यक्ष येणारे किंवा चौकशी करणारे किंवा आधीचे ग्राहक हे 'आपले ग्राहक' आहेत हे आधी ओळखता आले पाहिजे. कोणता ग्राहक वर्ग आपल्याकडे येऊ शकतो? कोणत्या वर्गाची गरज मी पूर्ण करू शकतो, हे समजणे महत्त्वाचे. त्यासाठी, ग्राहकांच्या सवयीचा, वागणुकीचा, निर्माण होणाऱ्या गरजेचा , आणि मानसिकतेचा सखोल अभ्यास करायला पाहिजे.


२. संपर्क साधा

आपले ग्राहक कोणते आहेत, याचा अंदाज यायला लागला की त्यांच्याशी संपर्क साधा. आपला पहिलाच अंदाज किंवा आभासातून निघालेले निष्कर्ष बरोबर येतीलच असे नाही. एका पेक्षा जास्त वेळा सर्वेक्षण होणे गरजेचे.

आपले ग्राहक कोणते आहेत, याचा अंदाज यायला लागला की त्यांच्याशी संपर्क साधा. आपला पहिलाच अंदाज किंवा आभासातून निघालेले निष्कर्ष बरोबर येतीलच असे नाही. एका पेक्षा जास्त वेळा सर्वेक्षण होणे गरजेचे. कोणाला लक्ष्य करायचे ? कोणता वर्ग आपल्या सेवा वापरण्यासाठी उत्सुक आहे? कोणता वर्ग आपली वस्तू / सेवा घेऊ शकतो? याची उत्तरे मिळाली की या सर्वांकडे , कोणत्या ना कोणत्या प्रकारे संपर्क प्रस्थापित करा.


या सेवा तुम्ही देत आहेत , ही माहिती प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष , योग्य माध्यमांचा समर्पक वापर करत , त्यांच्यापर्यंत पोहोचा .



३. संबंध टिकवा

ज्या ग्राहकांशी तुम्ही संपर्क करत आहातसंबंध, त्यांच्याकडून आलेल्या संदेशाला योग्य उत्तर आणि सेवा द्या. प्रसंगी, ग्राहक निर्माण होईपर्यंत सेवेला प्राधान्य द्या . तयार होणाऱ्या , झालेल्या , ग्राहकांशी सतत संपर्कात रहा . त्यांच्याशी संबंध जोडा. चांगली सेवा देऊन देऊन, हे संबंध टिकवून ठेवा.


४. वाढवा

आता नक्की झालेल्या या ' आपल्या ग्राहकां' कडून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत राहा. हे आजचे 'आपले ग्राहक'च , आपल्या उद्या होणाऱ्या ग्राहकाला बोलावणार आहेत.

होय ना ?


या सगळ्या प्रक्रियेमध्ये, सातत्य आणि पारदर्शकता खूप महत्वाची. पारदर्शकता आणि गुणवत्तेच्या बळावरच तुम्ही ग्राहकांचा विश्वास संपादन करू शकाल आणि ग्राहकाशी एक सशक्त नाते, दीर्घकाळाशी जोडणार आहात.



bottom of page