top of page

जाहिरात ' समजून ' करूया

जाहिरात करणे म्हणजे तुमचा व्यवसायाची माहिती ही तुमच्या ग्राहकांपर्यंत, सुयोग्य माध्यमांचा उपयोग करून, योग्य वेळेत पोहोचवणे (जाहिर करणे) .


जाहिरात म्हणजे दृक् किंवा श्राव्य संदेश विविध संपर्क माध्यमांतून जनतेस कळविणे. जाहिरातीने प्रभावित होऊन लोकांनी उत्पादित वस्तू किंवा सेवा घ्यावी, हा मुख्य हेतू जाहिरात करण्यामागे असतो. तसेच, व्यक्ती वा संस्था यांविषयी लोकांचे मत अनुकूल होऊन ते संदेशाबरहुकूम कार्यशील व्हावे, असाही हेतू जाहिरातीमागे असतो.


Advertising हा शब्द Latin भाषेतून घेण्यात आलेला आहे. मूळ Latin शब्द Advert. त्याचाच अर्थ लक्ष वेधून घेणे असे सांगता येईल. लक्ष वेधून घेण्याचे कार्य करणे म्हणजे " जाहिरात (ADVERTISING) " करणे होय. वस्तू व सेवांची मागणी निर्माण करणारी कला म्हणजे जाहिरात होय.




हो, जाहिरात ही एक कला आहे. त्या मध्ये पारंगत होण्यासाठी प्रयत्न तर करावे लागतील ना ?

या मुद्द्यांकडे थोडे लक्ष देऊया :


कोणासाठी ?

तुम्ही निर्माण केलेल्या वस्तू ह्या 'खास' आहेत , हे सांगण्याचा मार्ग म्हणजे जाहिरात. त्यामुळे, जाहिरात देखील ' खास ' च असली पाहिजे. त्यामुळे, जाहिरात करताना स्थानिक ग्राहकांची मानसिकता लक्षात घेऊन जाहिरात बनवा. जाहिरात ही आपल्या ग्राहकांसाठी असली पाहिजे. सगळेच ग्राहक हे आपले नसतात.


कुठे?

वृत्तपत्रे, मासिके, विशिष्ट नियतकालिके, बहिःस्थल जाहिरात (उदा., भित्तीपत्रे, प्रसिद्धिफलक, दुकानांच्या पाट्या, विजेच्या पाट्या इ.), परिवहन जाहिरात, प्रसिद्धिपट, सरकचित्रे, (सिनेमा स्लाईड), आकाशवाणी, दूरचित्रवाणी, प्रदर्शने व प्रात्यक्षिके, गवाक्षशोभन (विंडो डिस्प्ले), विक्री-केंद्र जाहिरात, टपाली जाहिरात, छापील माध्यमे (उदा., हस्तपत्रके, पुस्तिका, घडीपत्रिका, सूचिपत्रे इ. ), ग्रामीण भागासाठी माध्यमे (उदा., खास चित्रपट, प्रदर्शने व प्रात्यक्षिके, नभोवाणी, दूरचित्रवाणी, भित्तिपत्रके, दवंडी, हस्तपत्रके, वस्तूंचे नमुने) इ. जाहिरातींची माध्यमे रूढ आहेत.


पण, ' आपला' ग्राहक वर्ग कुठे आहे , त्यानुसार कोणते माध्यम वापरायचे हे ठरविले पाहिजे.

पारंपरिक आणि अपारंपरिक माध्यमांचा योग्य मेळ राखत केलेली जाहिरात ही ग्राहकांच्या जास्त लक्षात राहते.


कसे सांगायचे?

अगदी मोजक्याच शब्दात , पण, सोप्या आणि सुटसुटीत भाषेत .

जिथे जाहिरात करायची आहे तेथील भौगोलिक परिस्थिती आणि संस्कृती लक्षात घेऊन .

आणि जाहिरातीमधून प्रसन्नता दिसायला पाहिजे. संभ्रम निर्माण करणारी रंगसंगती आणि शब्द दोन्हींचा वापर शक्यतो टाळा.

ग्राहकांना जर भावनिक आवाहन करू शकला, तर उत्तम .


का ?

तीन ते चार सेकंदापेक्षा जास्त वेळ जाहिरात पाहण्यासाठी कोणीही वेळ देत नाही . " कशाबद्दल " आहे हे लगेच कळले पाहिजे .


गुणवत्तेमध्ये कोणतीही काटकसर नको

जाहिरात करूया. अति जाहिरात नको. शब्द, रंग, कोणत्याच बाबतीत अतिरेक नको. तुम्ही अर्वोत्तम आहेत, हे दिसले पाहिजे. त्यामुळे गुणवत्तेमध्ये कोणतीही काटकसर नको . जाहिरात ही आपल्या ग्राहकांना आकर्षित करणारे असावी.


कधी ?

जाहिरात सतत करत राहा .

जाहिरात न करणे म्हणजे स्वत:हुन आपला व्यवसाय बंद करणे.


अजूनही काही प्रश्न असतील, तर कधीही आमच्याशी संपर्क करू शकता. (९१ ९१६८५५३९७२)

bottom of page