top of page

' ध्येय ' ठरविताय ना ?

ध्येय ठरविले ना?

नाही?

विचार अजून स्पष्ट होत नाहीत ?


उद्योजकाचे ' ध्येय ' हे समतोल आणि संतुलित असावे. एकांगी , एकतर्फी नसावे. त्याचबरोबर, कौटुंबिक,आर्थिक,व्यावसायिक,शारीरिक,मानसिक,नैतिक या सहा कसोट्यांवर उतरले पाहिजे.


हे तर समजले ना? तर, मग आज आपण ध्येय कसे ठरवावे हे थोडे सखोलपणे, SMART होऊन समजून घेऊया.

चला, तर SMART (Specific, Measurable, Achievebale, Realistic, Time-bound) पद्धतीने आपले ध्येय निश्चित करूया


ध्येय हे नेहमी स्पष्ट आणि नेमके असावे (Specific)

मला व्यवसाय करायचा आहे. यापेक्षा मला अन्नधान्य क्षेत्राशी निगडित , व्यवसाय पुढील एक वर्षात सुरू करायचे आहे, हे जास्त योग्य नाही का ?

हो, हे अजूनही जास्त नेमक्या आपल्याला शब्दात मांडता येईल.


पहिल्याच प्रयत्नात कदाचित नेमकेपणे मांडता नाही येणार. पण , आपण व्यवस्थित विचार करून, अभ्यास करून , जे ध्येय ठरवूं , ते नक्कीच साध्य करू.. आणि असे मुळीच नाही कि या अभ्यासामध्ये आपला वेळ खर्ची होणार आहे. खर तर आपण वेळेची गुंतवणूक करत आहोत. जितके नेमक्या शब्दात आपण " मला काय करायचे आहे ? " हे सांगू शकू, तितक्याच झपाट्याने आपले आणि आपल्या उचित ध्येयामधले अंतर आपण कमी करु.

ध्येय हे मोजता येण्यासारखे हवे (Measurable)

" मला रोज व्यायाम करणे गरजेचे आहे. "

आणि " मी रोज १० मिनिटे चालण्याचा व्यायाम करणार आहे . " फरक आहे ना दोन वाक्यात?


तसेच , " मी तीन महिने सेवा देणार "

" मी तीन महिन्यात , दहा ग्राहकांना माझी 'अ ' प्रकारची सेवा पुरविणार आहे. " जर मी दहा ग्राहकांचे ध्येय ठरविले नाही , तर कदाचित दिशाहीन झाल्यासारखे होईल. माझी असलेली क्षमता मी कशा प्रकारे वापरणार आहे ते ठरविणे शक्य होणार नाही. म्हणून, मोजता येईल असे उद्दिष्ट ठरविणे , गरजेचे आहे.

ध्येय हे साध्य करण्यासारखे असावे. (Achievebale)

कठीण आणि अशक्य हे दोन वेगळे शब्द आहेत. ध्येय कठीण असेल तरी चालेल, अशक्य मात्र नको .

मी १० दिवसात २० किलो वजन वाढवेन , असे ठरविणे म्हणजे स्वतःची फसवणूक केल्यासारखे आहे.


ध्येय हे वास्तववादी असावे. (Realistic)

अनेक उद्योजकांना स्वत: च्या जगात , किंवा स्वप्नात जगण्याची खूप सवय असते. धावण्याच्या शर्तीचा शून्य अनुभव पाठीशी असताना, मी या वर्षीच्या आयर्न मॅन स्पर्धेत भाग घेणार आहे, असे म्हणणे म्हणजे केवळ स्वप्नरंजन.

असे वास्तवापासून अनेक योजने दूर असलेले ध्येय नको, जर ठेवले तर आपले यश देखील आपल्यापसून अनेक मैल दूर जाईल.


ध्येयपूर्तीची कालमर्यादा निश्चित हवी. (Time bound)

उद्दिष्ट पूर्तीची कालमर्यादा निश्चित करून त्यानुसार ध्येयाची आखणी करणे चांगले आहे.

" मी तीन महिन्यात , दहा ग्राहकांना माझी 'अ ' प्रकारची सेवा पुरविणार आहे. "इथे तीन महिन्यांची कालमर्यादा नसेल तर मी १२ महिन्यांमध्ये सुद्धा १० ग्राहकांचे उद्दिष्ट गाठू शकणार नाही.


या पाच चाचण्यांमधून, यशस्वीपणे पार होत जर तुम्ही उचित ध्येय ठरवू शकलात, तर तुमचे

अर्धे यश इथेच निश्चित आहे.



थोडक्यात काय तर यशाकडे तुमची वाट चाल चालू झाली आहे.

प्रयत्न आणि सातत्याच्या जोरावर तुम्ही लवकरच यशोशिखर पादाक्रांत करणार आहात ...





bottom of page