top of page

विलक्षण ऊर्जेचा स्त्रोत - पद्मविभूषण डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर


८ जानेवारी, २०२२.

नवीन वर्षाची सुरुवात दरवर्षीपेक्षा वेगळी झाली.हा दिवस माझ्या आयुष्यातील सुवर्ण क्षणांनी ओथंबलेला जणू अविस्मरणीय क्षण म्हणता येईल.


पुण्यातील ती भेट. अवघ्या ३६ मिनिटांचा भेटीचा कालावधी. भेट अशा व्यक्तिमत्वाची - ज्ञानपुंज, उर्जापुत्र, तेजस्वी, माझे गुरु, माझे भारतरत्न अर्थात पद्मविभूषण डाॅ.श्री. रघुनाथ अनंत माशेलकर. ज्यांच्या सहवासाने मी तेज:पुंज झालो.


आजचा हा सहवासाचा अनुभव विलक्षण होता. ज्यात त्यांच्याशी मला सुखद संवाद साधता आला. त्यांनी मला भविष्यातील पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन, कानमंत्र तर दिला. त्याचबरोबर, आपुलकीने माझ्या कुटुंबाची चौकशी केली.


मी त्यांच्यासाठी नेलेली छोटीशी भेट घेतल्यानंतर विनम्रतेचा कळस असा की , दिलेल्या भेटवस्तूचा डोक्याला नमस्कार करून स्वीकार केला. हे माझ्यासाठी स्वर्गसुख होते अत्यंत प्रेमळ आणि शिष्य म्हणून जवळ घेतल्यानंतर त्यांनी हात जेव्हा डोक्यावर ठेवला आणि म्हणाले, " तू खूप मोठ्या मनाचा आहेस. माझे आशीर्वाद नेहमी तुझ्याबरोबर आहेत. तू नक्कीच पुढे जाशील" हे शब्द ऐकुन मी नि:शब्द झालो.


साक्षात चैतन्यस्वरूप प्रकाशाच्या पायावर डोके ठेवून अनुभवलेला आत्मिक आनंद खरंच मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.




गुरुमुखातून झालेली 'शिक्षण' या विषयाची ज्ञानशिदोरी लाभली. शिक्षणाचा हक्क, योग्य शिक्षण, योग्य मार्गाने केलेले शिक्षण यावर केलेले मार्गदर्शन बहुमोल ठरले. जणू साक्षात ज्ञानमूर्ती आपल्याला जीवनाचा कानमंत्र देते आहे, यावर विश्वासच बसत नव्हता.


केवळ मार्गदर्शन नाहीतर मी केलेल्या कार्याबद्दल माझे कौतुक तर केलेच! पण त्याहून निरागसतेचा कहर म्हणजे माझ्यासोबत स्वतःहून फोटो काढण्याची अनुमती दिली.तो क्षण म्हणजे दिव्य अनुभूती ठरली.


मी लिहिलेले " Introduction to Sustainable Development Goals" जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी अंत:करणापासून असलेली तळमळ अनुभवास आली , त्यावेळी असे वाटले की जीवन सार्थकी झाले.


खरच ३६ मिनिटांच्या या कालावधीत जे घडले ते माझ्यासाठी अनपेक्षित होते. एवढ्याशा कालावधीत लाभलेला सहवास मला हा दिव्य स्वर्गानुभूती देणारा ठरला.


- प्रा.डॉ. प्रतिक राजन मुणगेकर.

bottom of page