स्वतःचा उद्योग / व्यवसाय सुरु करण्याची इच्छा आहे ?
मग निर्णय घेण्यापूर्वी एकदा हे वाचाच :
१. नोकरी मिळत नाही किंवा माझ्याकडे नोकरी नाही, म्हणून चुकूनही उद्योग धंद्याचे क्षेत्र निवडू नका.
तसेच, नोकरीतील वरिष्ठांना कंटाळून नवीन उद्योग करण्याचा अट्टाहास नको.
२. सगळ्यांचा सल्ला जरूर घ्या. निर्णय मात्र तुम्ही स्व त : घेणार आहात. निर्णय आणि त्या निर्णयाची जबाबदारी हि तुमचीच असेल.
३. माझ्या मित्राने / ओळखीच्या व्यक्तीने या व्यवसायात पैसा कमावला आहे , म्हणून मी पण हेच करणार असे अजिबात करू नका.
४. रोजगार मेळावा , व्यवसाय मार्गदर्शन मेळावे अशा ठिकाणी मिळालेल्या माहितीवर विसंबून उद्योग सुरु करू नका. हि सर्व माहिती परत एकदा तपासून पहा. त्यांनंतर निर्णय घ्या.
५.उद्योग सुरु करताना मित्र, नातेवाईक यांच्याकडून भांडवल घेऊ नका.
बाजारपेठेचा पूर्ण अभ्यास झाल्यानंतर भांडवल उभारणी कडे लक्ष द्या.
६ जो पर्यंत तुम्ही तुमच्या व्यायसायाची कल्पना कागदावर उतरवत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या कल्पनेचा आवाका लक्षात येणार नाही. सर्वात प्रथम सर्व गोष्टी लिहून काढा. अगदी लहानात लहान सुद्धा... जोपर्यंत तुम्ही या गीष्टी लिहीत नाही, तोपर्यंत काहीही करू नका.
७. एक व्यवसाय चालत नाही , म्हणून दुसऱ्या व्यवसायात उडी घेऊ नका. प्रत्येक व्यवसायाचे गणित हे वेगळे असते.
८. धाडस , आत्मविश्वास, कष्ट करण्याची तयारी या गोष्टी महत्वाच्या आहेतच. याबरोबर, संयम आणि अचूक वेळेत निर्णय घेण्याची क्षमता पण असायला हवी.
९. वाचनाला पर्याय नाही. सर्वसमावेशक वाचन हवे. उद्योजक म्हणून तुम्हाला आजूबाजूला घडणाऱ्या राजकीय, तंत्रज्ञान विषयक घडामोडींची माहिती तर हवीच. दुर्लक्ष करून चालणार नाही.
१०.दिवसातील २४ तासाच्या वेळेचे काटेकोर नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. काम, कुटुंब, मित्र, वाचन, व्यायाम, इ . या सर्व गोष्टी या दैनंदिन कार्यक्रमाच्या अविभाज्य भाग असायला हव्यात.
तुम्ही देखील वरील पैकी कोणत्याही एका कारणामुळे व्यवसाय करू इच्छित असाल, तर परत एकदा विचार करा.
Kommentare