top of page

" नाव " ठेवताय ?

नाव ठेवताय?


काय मग मित्र मैत्रिणींनो, पक्के केले का एखादे " नाव " ?


उद्योगाचे नाव काय असावे ?

कसे असावे ?

हा नक्कीच प्रत्येक उद्योजकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.

ज्याप्रमाणे, "व्यक्ती तितक्या प्रवृत्ती" त्याचप्रमाणे, जेवढे उद्योग तेवढी नावे. त्यातही प्रत्येक उद्योगाचे स्वरूप वेगळे, कार्यक्षेत्र वेगळे, काम करण्याचे प्रत्येकाचे तऱ्हा निराळी, नाही का?


विल्यम शेक्सपिअर ने भलेही सांगितले असेल की " नावात काय आहे? " पण, ज्या एका विशिष्ट

गोष्टीपासून तुमची आणि तुमच्या उद्योगाची / व्यवसायाची ओळख होण्यास सुरुवात होते, ओळख निर्माण होण्यास सुरुवात होते, ते तुमच्या उद्योगाचे / व्यवसायाचे / संस्थेचे नाव , हे तुमच्यासाठी "खूप" काही आहे.



तुम्ही कोणत्या प्रकारच्या सेवा देता? तुमचे ग्राहक कोण आहेत , कोण असावेत ? या सगळ्या प्रश्नांच्या पूर्वी जो पहिला प्रश्न तुम्हाला विचारला किंवा उपस्थित होतो तो म्हणजे तुमच्या कंपनीचे ( / संस्थेचे) नाव काय ?

तुम्ही कोठुन (कोणत्या कंपनीमधून ) आले आहेत ?

थोडक्यात काय तर, उद्योगाची ओळख ही त्याच्या नावापासून सुरू होते. आणि ते नाव " तुम्ही " म्हणजे उद्योजक ठरवितात.


" जेवढे उद्योग तेवढी नावे " अशा परिस्थितीमध्ये आपल्या उद्योगाचे नाव हे या नावांच्या " महाजालात ' हरवून न जाता ग्राहकाच्या मनावर ठसले गेले पाहिजे. ते टिकून राहण्यासाठी ते ठरवताना च जरा जास्त लक्ष देणे आवश्यक आहे.


१. यापूर्वी कोणीही ते नाव वापरलेले नसावे.

नवीन व्यवसाय सुरु करताय ना?

मग नाव जुने ठेवून कसे चातेल?

जरा वेळ काढून , भविष्याचा योजनाबद्ध विचार करून , नंतरच " या सम हेच " असे एकमेव , अद्वितीय नाव आपल्यासाठी निश्चित करा.


२.नाव हे अर्थपूर्ण आणि अर्थबोध होणारे असावे.

जे नाव तुम्ही ठरवले आहे ते अर्थपूर्ण आणि अर्थबोध होणारे असावे. तुमचे कार्यक्षेत्र किंवा तुम्ही ज्यांना सेवा देणार आहेत , ते कामाचे क्षेत्र समजून येणे गरजेचे आहे.


उदा. अबक एंटरप्राइजेस . हे कंपनीचे नाव आहे, एवढेच लक्षात आले ना?

अबक फिनाशिअल एंटरप्राइजेस हे असे असेल तर आर्थिक क्षेत्रामध्ये आहे हे लक्षात आले. पण कर संदर्भात आहे कि, ट्रैनिंग देते, कि अजून काही, ? याचा अर्थबोध होणे गरजेचे आहे.


३. नाव नेमके आणि सुटसुटीत हवे.

खूप जास्त जोडाक्षरे असलेले नाव लक्षात ठेवणे, सगळ्यांनाच जमेल असे नाही. ग्राहकांच्या लक्षात राहण्यासाठी किंवा त्याच्या मनात घर करण्यासाठी , तुच्याकडे किंवा तुमच्या नावाकडे ३० सेकांदापेक्षा कमी कालावधी असतो. या वेळेच्या आत ते मनात ठसले गेले पाहिजे.


मुख्य म्हणजे, जर नाव सोपे आणि सुटसुटीत नसेल तर तुम्हाला विक्री आणि विपणन जास्त खर्च करावा लागेल. जितके नाव क्लिष्ट असेल, त्या पटीत तुम्हाला विपन्नावर जास्त खर्च करावा लागेल.


उदा. टाटा मोटर्स.

आहे ना सोपे, सुटसुटीत, आणि नेमके सुद्धा.

टाटा ग्रुप मध्ये अनेक निरनिराळे, वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योग आहे. पण, प्रत्येकाची ओळख, वेगवेगळी आहे. जसे की , टाटा स्टील, टाटा पॉवर, इ



४. विनासायास उच्चार करता यायला पाहिजे.

नाव हे सोपे सुटसुटीत असण्या बरोबरच त्याच्या उच्चाराकडेही लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे. उच्चार करण्यास अवघड नावांकडे सहजसहजी लक्ष दिले जात नाही, किंवा टाळले जाते.


४. आंतरजालावर वापरता आले पाहिजे.

आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये, नावाला जेवढे नावाला जेवढे महत्त्व , तेवढेच किंवा त्याही पेक्षा थोडे अधिक महत्त्व हे तुमच्या महाजलावरील पत्ता काय आहे , याला आहे. मग तो तुमचे संकेतस्थळ असो, विविध समाज माध्यमांवर असलेला तुमचा वावर असो की तुमचे स्वतःचे खाते असो,...


याचा देखील विचार होणे गरजेचे आहे. तुमचे नाव छान, सोपे असेल, पण समजा, तुमच्या खात्त्याचे नाव अवघड किंवा क्लिष्ट असून कसे चालेल?


एका पेक्षा जास्त नाव किंवा पत्ता जर वापरात असाल, तर तशी व्यवस्था कायम सांभाळून तेवढे अवघड होते. त्यामुळे, नाव ते तुमच्या मातृभाषे बरोबर आंतरराष्ट्रीय भाषेमध्ये पण सोयोस्कर आहे ना हे एकदा नाही तर दोनदा तपासून पाहावे


५.संक्षिप्त रूप जर वापरणार असाल तर त्यामध्ये तीन पेक्षा जास्त आद्याक्षरे नकोत.

पार्टनर असणाऱ्या सर्वांच्या नावाची आद्यक्षारे एकत्र करून एक नाव ठरविले जाते. चुकीचे असे काहीच नाही. पण , यातून चुकीचा संदेश दिला जात आहे का? हे एकदा अवश्य तपासावे.


वरील, निकषांमध्ये बसणारी कमीत मी कमी तीन नावे निश्चित करा. आणि त्यांनतर नाव नोंदणीसाठी apply करा. तुमचे company secretary तुम्हाला पुढील कार्यवाहीसाठी नक्कीच मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर , तुम्ही आम्हाला देखील संपर्क करू शकता.


यशस्वी उद्योजकाची कल्पकता , विचारांची स्पष्टता, तुम्ही ज्या क्षेत्रात काम करणार आहात ते कार्यक्षेत्र , या प्रमुख घटकांचा योग्य अभ्यास करून जे नाव तुम्ही निश्चित कराल, ते नक्कीच अद्वितीय, अर्थपूर्ण , लक्षवेधक असेल.



नवीन उद्योगाचे " नामकरण " करण्यासाठी चा तुम्हाला अनेक शुभेच्छा ! !


bottom of page