top of page

सन्मान करूया वेळेचा

वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही आणि प्रत्येकाकडे दिवसाचे २४ तासच असतात.

हो ना ?


आपल्याकडे ' मुबलक ' प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या या वेळे कडे आपण कसे पाहतो ?

हो हा खरा प्रश्न आहे.


' वेळ नाही ' असे आपण किती तरी वेळा अगदी सहज बोलून जातो. कित्येकदा फक्त समोरील गोष्टींपासून किंवा व्यक्तीपासून पळुन जाण्यासाठी, नको असलेल्या कामातून सुटका मिळवण्यासाठी .

कुठे जातो हा तुमचा वेळ ?



उपलब्ध असणारा वेळ , हा सबबी पुढे करण्यासाठी किंवा कामे पुढे ढकलण्यासाठी नसतो.


वेळ ही सगळ्यात मोठी उपलब्धता आहे. उद्योजक म्हणून विकसित कदाचित , भांडवल , मनुष्यबळ , यंत्र सामुग्री याची तुम्हाला कमतरता , सुरुवातीच्या काही दिवसात , नक्कीच भासते. त्याच दिवसात , तुमच्याकडे , स्वतः: ला सकारात्मक दृष्ट्या सज्ज करण्यासाठी मुबलक प्रमाणात वेळ असतो. तुमच्या कल्पनेला विकसित करण्याचे सामर्थ्य या काळात लपलेले आहे.


वेळ हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे .

उद्योजक म्हणून पुढे जायचे असेल तर , जी अनेक बंधने पाळणे गरजेचे आहे त्यात सर्वात प्रथम म्हणजे वेळ पाळणे. मग तो वेळ कामासाठी,, स्वतःसाठी, कुटुंबासाठी, व्यायसायिक कारणासाठी किंवा अन्य कोणत्याही का असेना ... वेळेचा आदर राखायलाच हवा.


प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक सेकंदाचा सन्मान राखून केलेल्या कामाचे नियोजनच यशाची वाट दाखविते. वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही . कारण , भविष्याला जन्म देण्याचे अफाट सामर्थ्य या वेळेतच आहे.


बदलण्याची आणि बदल घडविण्याची संधी ही वेळ आपल्याला सतत देत असते. अपयशातून यशाकडे नेणारा रस्तादेखील वेळच तयार करते.म्हणूनच, वेळ पाळा.


प्रत्त्येक व्यक्तीसाठी, वेळेचे व्यवस्थापन आवश्यक आहे. विद्यार्थी असो वा गृहिणी, काम करणारा व्यावसायिक, प्रत्येकाने आपली कामे यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन केले पाहिजे.



चला तर मग

" चलता है रे " हा शब्दच शब्दकोषातून काढून टाका . जोपर्यंत तुम्ही वेळेला महत्त्व देणार नाही, तोपर्यंत तुमची वेळ येणार नाही.


bottom of page